'हा' तर सत्तेचा दुरुपयोग ; निलेश राणेंचे मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र

    दिनांक  25-Dec-2019 15:21:32
|


saf_1  H x W: 0


मुंबई : नुकतेच काही व्यक्तींच्या सुरक्षेमध्ये सरकरकडून बदल करण्यात आले. सचिन तेंडुलकरसह काही महत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेमध्ये घट करण्यात आली. तर शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांना 'झेड' सुरक्षा पुरवण्यात आली आहे. यावर आक्षेप घेत निलेश राणे यांनी शिवसेनेच्या सरकारवर टीका केली आहे. आदित्य ठाकरेंना झेड सुरक्षा कशी? असा खडा सवाल त्यांनी ट्विटरवरून केला आहे.

 
 
 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने १० रुपयाच्या थाळीची घोषणा केल्यापासून निलेश राणे यांनी टीकेचा सूर चालू ठेवला होता. आता १० रुपयात थाळी योजनेला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.

 
 
 
 
आता 'ही थाळी किती रुपयाची आहे???' असा प्रश्न विचारत एक ट्विट केले आहे. ठाकरे कुटुंबीयांचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्यांच्यासमोर जेवण वाढलेले दिसत आहे. तो फोटो ट्विट करून ही थाळी किती रूपयांची आहे, असा सवाल त्यांनी केला आहे.
वैचारिक लढ्यात सामील व्हा. लाईक करा. शेअर करा. जलद गतीने मजकूर मिळविण्यासाठी ॲप डाऊनलोड करा. महाएमटीबी सबस्क्राइब करा.