पत्रकार जमाल खगोशीच्या हत्येप्रकरणी पाच जणांना मृत्यूदंड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Dec-2019
Total Views |
Jamal _1  H x W



रियाद : अमेरिकन वृत्तपत्र 'वॉशिंग्टन पोस्ट'चे पत्रकार जमाल खगोशी यांच्या हत्येप्रकरणी आठ जणांना दोषी ठरवण्यात आले आहे. त्यापैकी पाच जणांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली आहे. तीन अन्य जणांनाही एकूण २४ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सौदी सरकारच्या पक्षातर्फे सांगण्यात आले की, पत्रकार खगोशी यांची हत्या काही जणांनी केली होती. या प्रकरणी ११ जणांवर खटला दाखल करण्यात आला होता. मात्र, ही नावे गुप्त ठेवण्यात आली होती.

 

तुर्की येथील सौदी दुतावासात झाली खगोशींची हत्या

खगोशी अमेरिकेच्या वॉशिंग्टन पोस्टमध्ये स्तंभलेखक होते. २ ऑक्टोबर २०१८ रोजी इंस्ताबुलच्या सौदी अरब येथील दुतावासाबाहेर ते शेवटचे दिसले. तिथे ते आपल्या लग्नासाठी आवश्यक कागदपत्रे आणण्यासाठी गेले होते. एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार, खगोशी यांना रियाद येथे नेण्यासाठी एक गट तिथे पोहोचला. त्यांनी तिथे जाण्यास नकार दिल्याने तिथेच त्यांची हत्या करण्यात आली.

 

अद्याप मृतदेह मिळाला नाही

तुर्की सरकारने मृतदेह शोधण्यासाठी संपूर्ण कस लावला. मात्र, त्यांचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. एका बातमीत असे म्हटले होते, की त्यांचा मृतदेह नष्ट करण्यासाठी त्यावर अॅसिड टाकण्यात आले होते.

 

सौदी प्रिंसवर हत्येचे आरोप

यापूर्वी बऱ्याचदा सौदी सरकार खगोशींची हत्या झाल्याचा दावा फेटाळत राहिले. तुर्कीतील अनेक वृत्तपत्रांतून त्यांच्या हत्येचा दावा वेळोवेळी करण्यात आला होता. संयुक्त राष्ट्रात एक्सपर्ट एग्नेस कॅलामार्ड दिलेल्या अहवालानुसार, प्रिंस मोहम्मद बिन सलमान आणि त्यांचे अधिकारी या हत्याप्रकरणाशी संबंध होते. मात्र, प्रिंसने हे सर्व आरोप फेटाळून लावले.

 

हत्येची नैतिक जबाबदारी स्वीकारली

अमेरिकेच्या पल्बिक ब्रॉडकास्टर सर्विसतर्फे प्रसिद्ध केलेल्या एका डॉक्यूमेंटरीत या हत्येची नैतिक जबादारी प्रिंस यांनी घेतल्याचे म्हटले होते. कारण त्यांच्या राज्यात ही हत्या झाली होती. नैतिक जबाबदारी असा उल्लेख केल्याने हा कबुली जबाब मानला गेला नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिमा जपण्यासाठी त्यांनी हे विधान केले असावे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

@@AUTHORINFO_V1@@