साताऱ्यामध्ये भूकंपाचे धक्के ; जीवितहानी नाही

    दिनांक  23-Dec-2019 12:43:13
|


asf_1  H x W: 0


सातारा : साताऱ्यातील कोयनानगर जवळील घोसाटवाडी (पाटण) भाग भूकंपाच्य सौम्य धक्क्यांनी पहाटे हादरला. २.८ रिश्टर स्केलचा हा सौम्य भुकंप असल्याने कोणतीही हानी झाली नाही. परिसरात पहाटे ६.४३ला बसलेल्या भूकंपाच्या सौम्य धक्क्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

 

सोमवारी पहाटे ६.४३ ला भूकंपाच्या सौम्य धक्क्याने कोयना, पाटण, कोकण किनारपट्टीचा परिसर हादरला आहे. भूकंपमापन केंद्रावर या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता २.८ रिश्टर स्केल तर भूकंपाच्या धक्क्याचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून ८ किमी होता. या भूकंपाचा धक्क्याने कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाली नसली तरी गुलाबी थंडी व साखरझोपेत असणाऱ्याची झोप मात्र उडाली आहे.

वैचारिक लढ्यात सामील व्हा. लाईक करा. शेअर करा. जलद गतीने मजकूर मिळविण्यासाठी ॲप डाऊनलोड करा. महाएमटीबी सबस्क्राइब करा.