‘प्लास्टिक’मुक्त मुंबईसाठी सरसावले हजारो हात

    दिनांक  22-Dec-2019 17:08:40
|

१ 5 _1  H x W:

 


मुंबई : शहरातील प्लास्टिक कचर्‍याची समस्या आणि त्यामुळे निर्माण होणारी पूरस्थिती याबद्दल जनजागृतीसाठी ‘केशवसृष्टी माय ग्रीन सोसायटी’तर्फे रविवारी ‘मुंबईकर... प्लास्टिक जमा कर’, ही मोहीम राबविण्यात आली.


१ _1  H x W: 0


मुंबई महापालिका, ‘ऑल इंडिया प्लास्टिक मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन’(ऐप्मा), राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) आदी संस्थांच्या हजारो स्वयंसेवकांमार्फत मुंबई आणि उपनगरांतील परिसरांत प्लास्टिक गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्याचे काम पार पडले. सोबतच मुंबईकरांना या मोहिमेचे महत्त्व पटवून देत सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आले.tejas_1  H x W:अंधेरीतील लोखंडवाला भागात केशवसृष्टीचे सचिव विनय नाथानी यांच्यासह ऑल इंडिया प्लास्टिक मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष हितेन भेंदा यांच्या मुख्य उपस्थितीत सकाळी ७.३० वाजता या मोहिमेची सुरुवात करण्यात आली.
मोठ्या संख्येने जमलेल्या स्वयंसेवकांनी या परिसरातील प्लास्टिक गोळा करून पुनर्वापर प्रक्रियेसाठी पाठवले. परिसरातील नागरिक, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये या मोहिमेची जनजागृती करण्यात आली.


१ _2  H x W: 0


चेंबूरच्या नारायण गजानन आचार्य उद्यान आणि परिसरातील सोसायट्यांमध्ये स्वयंसेवक मनोज परमार आणि सहकार्‍यांमार्फत ही मोहीम राबविण्यात आली. या ठिकाणी सोसायट्यांतील रहिवाशांनी महापालिका कर्मचार्‍यांच्या मदतीने प्लास्टिक गोळा करत या मोहिमेत आपला सहभाग नोंदवला. या मोहिमेत विजय टिबरेवाल, अनुपम शुक्ला, अरदीप राठोड आदी पदाधिकार्‍यांचे विशेष सहकार्य या मोहिमेला लाभले.


१ _3  H x W: 0
IMG_1  H x W: 0