आगीशी खेळ

    दिनांक  22-Dec-2019 20:46:10   
|


vichar_1  H x Wदेशाने मुस्लीम तुष्टीकरणामुळे काय होते, याचा अनुभव १९४६ साली झालेल्या भीषण जातीय दंगलीत घेतलेला आहे. ही सगळी आगलावी गँग देशाला त्या दिशेने ढकलण्यास निघाली आहे. त्यांचा हा आगीशी चालू असलेला खेळ, त्यांच्या स्वार्थाच्या पोळ्या भाजून घेण्यासाठी जरी ठीक असला तरी देशाच्या दृष्टीने मात्र अतिशय घातक आहे.नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी देशभरात वेगवेगळ्या राज्यात प्रायोजित आंदोलने चालू आहेत
. पडद्यामागून काँग्रेस सूत्र हलवित आहे. त्यांना साथ देण्यासाठी ममता बॅनर्जी, शरद पवार, कम्युनिस्ट पक्ष, नक्षलवादी, उरलेसुरले समाजवादी मैदानात उतरले आहेत. सुधारित नागरिकत्व कायदा मुसलमानांच्या विरोधात आहे, त्यांचे नागरिकत्व समाप्त केले जाणार आहे. त्यांना देशातून बाहेर काढले जाईल, अशा प्रकारचा प्रचार या मंडळींकडून सुरू आहे. ते आगीशी खेळत आहेत. सुधारित नागरकित्व कायद्यामध्ये भारतातील मुसलामानांसंबंधी कोणतेही कलम नाही. पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान या तीन मुस्लीम देशांत हिंदू, बौद्ध, जैन, शीख, पारशी, ख्रिश्चन यांचा धार्मिक छळ होतो.मुस्लीम देशांमध्ये बिगरमुसलमान काफर असतात
. इस्लामने जगाची विभागणी दोन भागांत केली आहे. पहिल्या भागाला ‘दार-उल-इस्लाम’ असे म्हणतात आणि दुसर्‍या भागाला ‘दार-उल-हरब’ असे म्हणतात. दार-उल-हरबचे, दार-उल-इस्लाम करणे, हे मुसलमानांचे पवित्र धार्मिक कर्तव्य समजले जाते. यामुळे इस्लामी देशामध्ये गैरइस्लामी लोकांना आपल्या धर्माचे पालन करता येत नाही. तेथे त्यांचा धार्मिक छळ होतो. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांतील धार्मिक छळाच्या कथा वेळोवेळी वर्तमानपत्रातून येत असतात. धार्मिक छळाला कंटाळून या देशातील वर दिलेल्या धर्मातील लोक भारतात येतात. त्यांना नागरिकत्व देण्याबाबतचा हा कायदा आहे. मुसलमानांचे नागरिकत्व काढून घेण्याचा नाही. ही साधीशी गोष्ट आहे.ही साधी गोष्ट सोनिया गांधी
, प्रियांका गांधी, राहुल गांधी या गांधी परिवाराला समजली तर ते गांधी कसले? त्यांनी या प्रश्नावरून देश पेटविण्याचे ठरविले आहे. त्यांना जशी राजकीय पक्षांनी साथ दिलेली आहे, तशी देशातील ७२० लोकांनी ज्यात माजी न्यायमूर्ती, लेखक, अभिनेते आणि आंदोलनकारी येतात. त्यांची नावे देतो, म्हणजे ही मंडळी कोण आहेत, हे आपल्या लक्षात येईल. जावेद अख्तर, अपर्णा सेन, स्वामी अग्निवेश, पी. बी. सावंत, सुरेश होसबेट, बी. जी. कोळसे-पाटील, अशी ही सर्व नावे आहेत. या नावांचा परिचय वाचकांना असेलच. जेव्हा जेव्हा देशहिताचा, हिंदूहिताचा, राष्ट्रहिताचा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा ही सर्व मंडळी याविरुद्ध उभी राहतात.विरोध सुरू करतात
. आपण त्यांना इतके मोठे करून ठेवले आहे की, त्यांचे बोलणे मोठ्या बातमीचा विषय होतो. आभास निर्माण केला जातो की, यांच्या मुखातून सद्सद्विवेकबुद्धी बोलत असते. ही मंडळी इतकी हुशार आहेत की, ते आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ कधी राज्यघटना उद्धृत करतील, कधी बाबासाहेबांना उद्धृत करतील, महात्मा गांधींवर तर त्यांचा एकाधिकारच आहे. अशी सर्व गँग, नागरिकत्व सुधारणा कायद्याविरुद्ध एकवटली आहे. त्यांचे रडणे कोणासाठी चालू आहे, हे न समजण्याइतके लोक काही महामूर्ख नाहीत. त्यांचे रडणे अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशमधून अवैध मार्गाने भारतात घुसणार्‍या मुसलमानासंबंधी आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की, या लोकांनादेखील भारतात घुसू द्या आणि त्यांना भारताचे नागरिकत्व द्या. मोदी सरकार हे करायला तयार नाही. म्हणून हे सरकार मुसलमानविरोधी आहे, असे सामान्य मुसलमानांना सांगून त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालू आहे. हा आगीशी खेळ आहे.पूज्य डॉ
. बाबासाहेबांनी भारताची राज्यघटना लिहिली. या राज्यघटनेत एकही कलम असे नाही की, जे घुसखोर मुसलमानांना नागरिकत्व दिले पाहिजे, असे सांगते. नागरिकत्वाच्या अटी काय आहेत, हे राज्यघटनेत नमूद केले आहे. पूज्य डॉ. बाबासाहेब ‘लिंग्विस्टिक स्टेट’ या प्रबंधात म्हणतात, “भारतापासून पाकिस्तान वेगळा झाला, याचा मला आनंद झाला आहे. मी पाकिस्तानचा तत्वज्ञ आहे, असे म्हणतात. मी फाळणीचा पाठपुरावा केला. कारण की मला असे वाटले, विभाजनामुळे हिंदू केवळ स्वतंत्र होतील, असे नाही तर ते मुक्त असतील. जर पाकिस्तान आणि भारत अखंड राहिले असते तर हिंदूंना स्वातंत्र्य मिळाले नसते, पण त्यांना मुसलमानांच्या दयेवर जगावे लागले असते. केवळ स्वतंत्र भारत हा हिंदूंच्या दृष्टीने मुक्त भारत झाला नसता आणि या भारतात मुसलमान शासनकर्ती जमात झाली असती.” उठसूट बाबासाहेबांना उद्धृत करणार्‍यांनी मुस्लीम समाज आणि मुस्लीम मानसिकता याविषयी बाबासाहेबांचे काय म्हणणे होते, याचा अभ्यास केला पाहिजे. असा अभ्यास न करता मुसलमानांबरोबर दलितांना जोडण्यासाठी धूर्तपणे वर दिलेले ७२० जण आणि काँग्रेस पक्ष खेळ खेळत आहेत. हा आगीशी खेळ आहे.देशाचे विभाजन झाल्यानंतर जे हिंदू पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तानात राहिले
, त्यातील बहुसंख्य दलितच होते. जे सवर्ण होते, त्यांना तेथील मुसलमानांनी भारतात हाकलून लावले, त्यांची जमीन, घरे-दारे, आपल्या ताब्यात घेतली आणि दलितांना मात्र जाऊ दिले नाही. परंपरेने त्यांना जी कामे करावी लागत होती. मैला वाहून नेण्याची, मेलेली जनावरे उचलण्याची, त्यांची कातडी काढण्याची, ही कामे करण्यासाठी त्यांना तिथेच ठेवण्यात आले. त्यांच्यावर खूप धार्मिक अत्याचार होऊ लागले. तेव्हा बाबासाहेब म्हणाले की, “तुम्ही भारतात परत या. भारतात तुमचे रक्षण होईल.” आज आपले सरकार हेच काम कायदा करून करीत आहे आणि त्याला विरोध देशाला आग लावणारे लोक करीत आहेत. देशाने मुस्लीम तुष्टीकरणामुळे काय होते, याचा अनुभव १९४६ साली झालेल्या भीषण जातीय दंगलीत घेतलेला आहे. ही सगळी आगलावी गँग देशाला त्या दिशेने ढकलण्यास निघाली आहे. त्यांचा हा आगीशी चालू असलेला खेळ, त्यांच्या स्वार्थाच्या पोळ्या भाजून घेण्यासाठी जरी ठीक असला तरी देशाच्या दृष्टीने मात्र अतिशय घातक आहे.काँग्रेसचे नेते सर्वोच्च न्यायालयात वकिली करणारे अभिषेक मनू सिंघवी म्हणतात
, “भारत आंतरराष्ट्रीय कनव्हेन्शनचा सभासद आहे. हे कनव्हेन्शन सांगते की, एखाद्या देशात छळवणूक होत असेल तर तेथील लोकांना आपल्या देशात आश्रय दिला पाहिजे.” भारत, मानवी अधिकाराच्या या मूल्यांना बांधील आहे. अभिषेक मनू सिंघवी यांचे अभिनंदन! आपल्याला माहीत नसलेल्या एका विषयाची त्यांनी माहिती करून दिली. वकील युक्तिवादात फार तज्ज्ञ असतो, असे आपण समजतो, परंतु मनू सिंघवी यांचे तर्कशास्त्र दुर्बळ दिसते. अन्य देशात छळ होतो म्हणूनच नागरिकत्व सुधारणा कायदा आणण्यात आलेला आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय कनव्हेन्शनचे पालन केले आहे. मनू सिंघवी यांना हे सांगायचे आहे की, या शरणार्थींमध्ये शरणार्थी मुसलमानांनासुद्धा सामावून घ्या. पण ते असे बोलत नाहीत. न बोलता ते खूप काही बोलून गेलेले आहेत. याच मानवी अधिकाराच्या मूल्यांचे पालन करत, नुकताच भारत सरकारने, पाकिस्तानातील हसीनाबेन अब्बास वारसीया या महिलेला भारताचे नागरिकत्व बहाल केले आहे. कोणतेही सोपस्कार किंवा नियम न पाळता फक्त मेरीट आणि मानवतेच्या अधिकाराच्या आधारावर हे नागरिकत्व बहाल करण्यात आले आहे.सामान्य मुसलमानांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की
, काँग्रेस आणि त्यांचे ७२० साथीदार मुसलमानांचा उपयोग आगीत लाकडे भरण्यासाठी करीत आहेत. गेली सत्तर वर्षे काँग्रेस आणि त्यांच्या या ७२० साथीदारांनी हेच काम केले आहे. पाकिस्तान झाल्यानंतर सगळे मुसलमान पाकिस्तानात गेले नाहीत. भारतात राहणार्‍या मुसलमानांनी भारत आपला देश आहे, असे मानले. त्यामुळे आपल्या घटनाकारांनी त्यांना समान अधिकार दिले आहेत. राज्यघटनेचे संरक्षण दिलेले आहे. ते कोणतेही सरकार काढून घेऊ शकत नाही. याविषयी जे भ्रम पैदा करत आहेत, ते आपले मित्र नसून शत्रू आहेत, असेच समजले पाहिजे. स्वतःचे हित कशात आहे, हे डोळसपणे बघायला शिकले पाहिजे. आगीशी खेळ खेळू नये.देशाच्या दीर्घकालीन हिताचा विचार करता पुढील गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे
. एक कावळा एक बी घेऊन उडत होता. त्याच्या चोचीतून ते बी खाली पडते. एका भिंतीच्या पायाशी ते बी येते. ते बी भिंतीला म्हणते, “मला जरा आश्रय देतेस का? तू खूप मोठी आहेस, मी तुझ्या पायथ्याशी एका बिळात राहू शकतो.” भिंतीला त्याची दया येते. ती त्याला आपल्या पायथ्याशी, एका छोट्या बिळात राहायला जागा देते. काही दिवसानंतर पाऊस येतो. त्या बीला कोंब येतात. हळूहळू ती वाढू लागते. काही वर्षांत भिंतीपेक्षाही बीचे अंकुर उंच होतात. आणखी काही वर्षे जातात. तिची मुळे दगडांमध्ये चुना, सिमेंट पार करून भिंत फोडू लागतात. एकेक दगड ढिला होतो आणि पडतो. सगळी भिंत खिळखिळी होते. छोट्या बीचा मात्र मोठा वृक्ष तयार होतो. भारतात येणारा प्रत्येक घुसखोर हा, या बीसारखा आहे. पुढे आणखी काही लिहिण्याची गरज नाही.