हैदराबादप्रकरणातील आरोपींचे पुन्हा शवविच्छेदन होणार

21 Dec 2019 16:22:50

disha_1  H x W:



हैदराबाद :
तेलंगणा उच्च न्यायालयाने पशुवैद्यकीय महिला डॉक्टर सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील एनकाऊंटर झालेल्या चारही आरोपींचे शवविच्छेदन पुन्हा करण्याचे आदेश दिले आहेत. हैदराबादजवळील चट्टनपल्ली येथे पोलीस एनकाऊंटरमध्ये या आरोपींचा मृत्यू झाला होता. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणी चौकशी सुरू आहे.


डॉक्टर दिशाच्या खुनात आरोपी असलेल्या चौघांचाही पोलीस एनकाऊंटरमध्ये मृत्यू झाला आहे. प्रकरण संवेदनशील असल्या
ने आरोपींचे मृतदेह हैदराबादमधील गांधी रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. मात्र, ते आणखी जास्त काळ ठेवता येणार नसल्याने त्याबाबत पुढील निर्देश द्या, अशी मागणी रुग्णालय प्रशासनाने न्यायालयात केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने वरील आदेश दिले आहेत.


एन्काउंटरची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालया
ने अलीकडेच त्रिसदस्यीय आयोगाची स्थापना केली आहे. त्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती रेखा बलदोटा आणि सीबीआयचे माजी संचालक कार्तिकेयन यांचा समावेश आहे. सहा महिन्यात आयोग आपला अहवाल न्यायालयात सादर करणार आहे.

Powered By Sangraha 9.0