नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधी ट्विट फरहान अख्तरला भोवलं

21 Dec 2019 13:10:58

farhan_1  H x W



देशभरात सर्वत्र सध्या नागरिकत्व दुरूस्ती कायद्या
वरून गदारोळ सुरू आहे. आंदोलनांना काही ठिकाणी हिंसक वळणही मिळाल्यामुळे देशातील अनेक ठिकाणी इंटरनेट सुविधाही खंडित करण्यात आली होती. बॉलिवूडकरही या आंदोलनामध्ये उतरले आहेत. अभिनेता फरहान अख्तरने काही दिवसांपूर्वी या कायद्याला विरोध दर्शवणारे एक ट्विट केले होते. पण त्या ट्विटमुळे आता फरहान आला गोत्यात आला आहे.




नागरिकत्व सुधारणा कायद्या
विरोधात फरहान अख्तरने केलेल्या ट्विटमुळे हैदराबाद पोलिसांनी त्याच्यावर कलम १२१ (सरकार विरोधात युद्ध पुकारणे किंवा युद्धाला प्रोत्साहन देणे), १२१ अ (सरकार विरेधात युद्धाचा कट रचणे), १२० ब (गुन्हेगारी कट रचणे) आणि कलम ५०५ (समाजात तेढ निर्माण करणे) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


वकील
असणाऱ्या के. करुणा सागर यांनी हैदराबादच्या सैदाबादमध्ये फरहान विरोधात तक्रार दाखल केली आहे. देशविरोधी ट्विट करत, देशातील विविध समाजांमध्ये शत्रुत्वाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप फरहान अख्तरवर लावण्यात आला आहे.

Powered By Sangraha 9.0