
'सामना'तील टीकेला ॲड.आशिष शेलारांचे जशास तसे उत्तर
मुंबई : शिवसेनेने भारतीय जनता पक्षसोबत युती तोडत जनादेश धुडकावत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. तत्पुर्वीपासूनच शिवसेनेचे खासदार व सामनाचे संपादक संजय राऊत हे भाजपवर वारंवार बिनबुडाचे आरोप करत आहेत. शनिवारीही 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रातून त्यांनी भाजपवर टीका केली. परंतु भाजपचे आमदार ॲड. आशिष शेलार यांनी या अग्रलेखास ट्विट करत चोख प्रत्युत्तर दिले. 'भाजपचे ३० वर्ष ओझे असेल…तर आता दोघांना सोबत घेतले आहे ती ओझ्याची गाढवे आहेत का?? "अशा शब्दांत शेलारांनी सेनेला प्रत्युत्तर दिले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखत दिली होती.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात
,"
पत्रपंडित आता बदललेत?
नव्या विचारधारेची लाली पावडर लावून "बडे की बिर्याणी" व “
इटालीयन पिज़्ज़ा”
खात,
सरकारची "सच्चाई" ते लिहितात?
भाजपचं ३०
वर्ष ओझं होतं?
आता दोघांना सोबत घेतलेय,
ती काय ओझ्याची गाढवं आहेत का?
ओझं उतरलं की,
कोण कुणाच्या नजरेतून उतरलंय?
हाच खरा "रोखठोक" सवाल आहे!" अशी खोचक टीका करत शिवसेनेच्या अग्रलेखाला प्रत्युत्तर दिले.