रंगभूमीच्या 'नटसम्राटा'ला आज अखेरचा निरोप

20 Dec 2019 11:07:04

lagoo_1  H x W:



पुणे : नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांना अखेरचा निरोप दिला जाणार आहे. अंत्यसंस्करापूर्वी डॉ. लागू यांचे पार्थिव पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुभाष देसाई यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच डॉ. लागू यांचे चाहते यावेळी उपस्थित राहणार आहेत.


मंगळवारी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले होते.
वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉ.लागू यांचे पुत्र विदेशात होते. गुरुवारपर्यंत ते पोहोचू शकत नसल्याने, डॉ. लागूंवर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे रूपवेध प्रतिष्ठान तर्फे कळवण्यात आले होते.



डॉक्टर ते अभिनेता एक समृद्ध प्रवास...

श्रीराम बाळकृष्ण लागू असे त्यांचे नाव असले तरीही कला क्षेत्रात त्यांना डॉक्टर या नावाने ओळखले जात होते. वैद्यकीय महाविद्यालयात जात असतानाच त्यांनी अभिनयाच्या कारकिर्दीस सुरुवात केली होती. याच दरम्यान, ५० च्या दशकात त्यांनी मुंबई विद्यापीठातून 'ईएनटी' (कान, नाक, घसा) यामध्ये मेडिकलची पद्वी मिळवली होती. पुढील ६ वर्षे पुण्यात त्यांनी प्रॅक्टिसदेखील केली. यानंतर त्यांनी कॅनडा आणि इंग्लंडला जाऊन पुढील प्रशिक्षण घेतले. नाट्य आणि चित्रपट क्षेत्रात काम करताना श्रीराम लागू यांनी पुरोगामी नाट्य संघटना सुरू केली. तसेच समविचारी कलाकारांना सोबत घेऊन आपले विचार पुढे नेले. 'देवाला रिटायर करा' अशी आरोळी करत त्यांनी पुरोगामी आणि तर्कसंगत सामाजिक कारणांसाठी आवाज उठवला.

Powered By Sangraha 9.0