स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्राबाहेर शेकडो नागरिकांचे समर्थन

    दिनांक  20-Dec-2019 10:06:48
|

कॅब_1  H x W: 0


पुणे : नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ पुण्यातील स्वातंत्रवीर सावरकर अध्यासन केंद्र येथेही शेकडो नागरिक जमले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना विवेक विचार मंचच्या वतीने प्राध्यापक बालाजी चिरडे म्हणाले की, “पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान हे भारताचे शेजारी देश असून हे तिन्ही देश अधिकृतपणे इस्लामिक देश आहेत. तिथे धर्माच्या आधारावर गैर-मुस्लिम लोकांवर अत्याचार होतात. म्हणून तेथील गैर-मुस्लिम नागरिकांचा मानवी दृष्टिकोनातून विचार होणे आवश्यक आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहता भारत हेच त्यांचे मूळ घर आहे. जगात अन्य कुठेही त्यांना थारा मिळू शकत नाही, ” असे ते यावेळी म्हणाले.


पाकिस्तानातील अहमदिया किंवा बलूच का नाही घेतले याविषयी ते म्हणाले की
, “तीन देशांमध्ये मुस्लमानांमध्ये जे काही आंतरिक वाद आहेत ते वेगळे आहेत. त्यांच्यावर धर्माच्या आधारे अत्याचार होत नाहीत कारण ते देश स्वत: इस्लामिक आहेत, ”असे त्यांनी सांगितले,


म्यानमारमधील रोहिंग्या मुसलमानांविषयी आणि श्रीलंकेतील तामिळनागरिकांविषयी ते म्हणाले की
, “तो वाद राजकीय-सांस्कृतिक आहे. तिथे रोहिंगे इस्लामिक जिहाद करतात आणी फुटिरतावादी चळवळ चालवतात. म्यानमार या देशात बौद्ध बहुसंख्यक असले तरी तो देश अधिकृत बौद्ध देश नाही. श्रीलंकेचा विषय सुद्धा म्यानमारसारखाच राजकीय असून श्रीलंका देखील धार्मिक देश नाही. या पूर्वी लाखो श्रीलंकन तामीळ लोकांना भारतात नागरिकत्व देवून सामावून घेतले आहे. इतर कुणाला (मुस्लिम) भारताची नागरिकता हवी असेल तर त्यांना जो पूर्विचा सर्वांकरिता कायदा आहे, त्यानुसार अर्ज करता येईल. भारताचे जे सर्व विद्यमान सर्वधर्मीय नागरिक आहेत, त्यांच्याविषयी हा कायदा नाही, त्यामुळे भारतातील कोणत्याही नागरिकांना चिंता करण्याची काहीच गरज नाही. या कायद्याने कुणाचाहि अधिकार काढून घेत नसून पीड़ित लोकांना मानवाधिकार बहाल करण्यात येत आहे, ” असे ते म्हणाले.