सेन्सेक्सची उसळी; शेअर बाजार तेजीत

    दिनांक  20-Dec-2019 11:49:59
|

sensex_1  H x Wमुंबई : मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सची विक्रमी तेजी आजही कायम आहे. काल, गुरुवारी हॅट्रिक साधलेल्या सेन्सेक्सची शुक्रवारी बाजार सुरु होताच तेजी कायम होती. प्रमुख कंपन्यांचे शेअर्समुल्य गेल्या दोन दिवसांत वाढले आहे. तरीही गुंतवणूकदारांकडून चढत्या दराने शेअर्सची विक्री सुरूच आहे. आज सकाळच्या सत्रात सेन्सेक्सने ९६ अंकांनी वृद्धी साधून ४१,७६८ पर्यंत उसळी घेतली. निफ्टीतही आज तेजी दिसू आली.


गेले तीन दिवस सेन्सेक्सने उच्चांक मोडला. आयटी, वाहन आणि उर्जा उद्योगांतील शेअर्सना अधिक मागणी आहे. यामुळे हा भाव तेजीत दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसांत सेन्सेक्समध्ये ६१९ अंकांनी वाढ झाली. यामुळे मुख्य शेअर्सच्या किंमतीत वाढ झाली आहे.


रिलायन्स, भारती एअरटेल, हिंदुस्थान युनिलिव्हर, महिंद्र अँड महिंद्रा, टीसीएस, एशिअन पेंट्स या कंपन्यांच्या शेअर्सना अधिक मागणी आहे.