दिल्लीत भूकंपाचे धक्के !

20 Dec 2019 17:43:13


delhi_1  H x W:



नवी दिल्ली
: उत्तर भारतातील अनेक शहरांमध्ये शुक्रवारी संध्याकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. मिळालेल्या माहितीनुसार, काश्मीरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. दिल्ली-एनसीआर तसेच पंजाब आणि हरियाणामध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तान असल्याचे सांगितले जात आहे. अफगाणिस्तानात भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.१ रिश्टर स्केल इतकी नोंदविली गेली आहे. अफगाणिस्तानात भूकंपाची तीव्रता अधिक होती. अफगाणिस्तानाची राजधानी काबूलच्या ईशान्य दिशेस भूकंप झाला.



रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ६ .१ होती. भूकंपाचे केंद्रबिंदू
255 किलोमीटर होते. सायंकाळी ५ वाजता हादरे जाणवले. भूकंपामुळे लोक घाबरले आणि घराबाहेर पडले. हादरे एकापेक्षा जास्त वेळा जाणवले. भूकंपाचे हादरे सुमारे १५ ते २० सेकंदापर्यंत जाणवले.



प्रभावित प्रदेश

-भारत

-पाकिस्तान

-ताजिकिस्तान

-उझबकिस्तान


केंद्र:
 तळेकानपासून ८३ कि.मी.

वेळः सायंकाळी ५ : ५९ मि.

Powered By Sangraha 9.0