अयोध्या निकालाविरोधात 'जमियत'ची पुनर्विचार याचिका

    दिनांक  02-Dec-2019 17:49:09
|


saf_1  H x W: 0


नवी दिल्ली : अयोध्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात जमियत उलेमा ए हिंदने फेरविचार याचिका दाखल केली आहे. या याचिकेत प्रामुख्याने बाबरी मशिदीच्या पतनाबाबत सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या टिपण्णीवर बोट ठेवण्यात आले आहे. 'बहुसंख्य मुस्लिम हे फेरविचार याचिका दाखल करावी या मताचे आहेत.' असे जमियतचे प्रमुख मौलाना अर्शद मदानी यांनी सांगितले.

 

'आम्ही आजच फेरविचार याचिका दाखल करणार नाही. आम्ही आमची फेरविचार याचिका तयार केली आहे. ९ डिसेंबरपूर्वी आम्ही केव्हाही याचिका दाखल करु.' असे अखिल भारतीय मुस्लिम व्यक्तिगत कायदा मंडळाचे जफरयाब जिलानी यांनी सांगितले. तसेच, "मशिदीची जमीन अल्लाहच्या मालकीची आणि शरीयाच्या अधिपत्याखाली असल्याने ती कोणालाही दिली जाऊ शकत नाही, असे मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सरचिटणीस जिलानी यांनी मागच्या महिन्यात बोर्डाच्या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले होते. अयोध्येत मशिदीच्या बदल्यात पर्यायी जागा स्वीकारण्यास बोर्डाचा तीव्र विरोध आहे, असे जिलानी म्हणाले होते.