भारतीय हस्तकलांचा नजराणा मुंबईकरांच्या भेटीला

    दिनांक  02-Dec-2019 12:58:49
|

sari_1  H x W:

 


मुंबई : भारतीय हस्तकलांचे संपूर्ण जगाला आकर्षण असते. हातमाग क्षेत्रामध्ये भारतीय कलाकारांना उच्च दर्जाचे स्थान आहे. मात्र त्यांना योग्य दिशा व आपली कला प्रदर्शित करायला विपणन साधनांची माहिती नसल्याकारणाने हे इतर कलांच्या तुलनेत हे कलाकार मागे पडतात.

 

हेच लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाने 'झरोखा' हे हस्तकला प्रदर्शन संग्रहालयाच्या कुमारस्वामी सभागृहात भरविण्यात आल्याची माहिती छ. शि. महाराज वस्तू संग्रहालयाच्या गॅलरी आणि सामान्य व्यवस्थापन विभागाच्या संचालिका मनीषा नेने यांनी दिली. २ डिसेंबर ते ६ डिसेंबर यादरम्यान सकाळी १०.३० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत हे प्रदर्शन असणार आहे.

 

या प्रदर्शनात भारतातील दुर्मिळ हस्तकलांचे नमुने आपणास पाहण्यास व खरेदी करण्यास मिळतील. याठिकाणी या कलेत पारंगत असणारे कलाकार आपल्या कला सादर करतील. यामध्ये पश्चिम बंगालमधील 'कंथ', पंजाबची 'फुलकारी यांसारख्या भारताच्या कानाकोपऱ्यातून हातमाग आणि विणकाम केलेली वस्त्रे, भारतीय शैलीतील दागिने, गृहसजावटीच्या वस्तू, राजस्थानी चित्रशैलीतील प्रसिद्ध 'मधुबनी' चित्रे, महाराष्ट्रातील 'वारली' चित्रे, पारंपरिक लाकडी खेळण्या, ओरिसाची ओळख असणारी पटचित्रेयांसह अनेक दुर्मिळ आणि आकर्षक वस्तूंचा ठेवा याठिकाणी पाहायला आणि खरेदी करायला मिळणार आहे.

 

भारतीय परंपरांचा आणि कलेचा ठेवा जपत या कलांना व कलाकारांना जगापुढे आणत त्यांना हक्कच व्यासपीठ मिळावी याकरिता छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय सातत्याने कार्यरत असते. या कलेची आवड असणाऱ्या आणि आकर्षक वस्तू खरेदी करू पाहणाऱ्यांसाठी हे प्रदर्शन नक्की पर्वणीच ठरेल. भारतीय कलांचं अभिजात सौदर्य पाहण्यासाठी एकदातरी या प्रदर्शनाला भेट द्यावी,असे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्यावतीने करण्यात आले आहे.