अरेच्च्या! 'हा' तर अजित पवार शॉट...

    दिनांक  02-Dec-2019 18:35:16
|


asf_1  H x W: 0

 


मुंबई : क्रिकेटमध्ये अनेक फलंदाज वेगवेगळ्याप्रकारे फलंदाजीचे कौशल्य दाखवत विविध प्रकारची खेळी खेळतात. प्रत्येक फलंदाजाची शैली ही वेगळी असते. तसेच मैदानात परिस्थितीनुसारही ते आपल्या फलंदाजीच्या स्टाईलमध्ये बदल करत असतात. कपिल देव यांचा नटराज शॉट, धोनीचा हेलिकॉप्टर शॉट, दिलशानचा दिल स्कुप आणि असे अनेक खेळाडूंनी त्यांची शैली दाखवत स्वतःच्या नावावर त्या शॉट्सचे नामकरण करून घेतले. परंतु, सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओला नेटकऱ्यांनी 'अजित पवार शॉट' असे नाव दिले आहे.

 

काय आहे हा 'अजित पवार शॉट' ?

 

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) काही दिवसांपूर्वी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ अपलोड केला होता. हा व्हिडीओ न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या एकदिवसीय फोर्ड ट्रॉफी स्पर्धेचा होता. या स्पर्धेत 'ग्लेन फिलिप्स' नावाच्या फलंदाजाने आपल्या फलंदाजीने गोलंदाजीची हवा काढून घेतली. या सामन्यात 'ऑकलंड' संघाच्या ग्लेनने एक चमत्कारिक रिव्हर्स शॉट खेळला. फिलिप्सचा हा अनोखा रिव्हर्स शॉट पाहून विरोधी संघातील खेळाडू आणि प्रेक्षकही थक्क झाले.

 
 
 

फिलिप्सने षटकारासाठी लागवलेला हा शॉट क्रिकेटमध्ये पहिले कधीही पाहायला मिळाला नव्हता की या शॉटची दाखल खुद्द आयसीसीनेही घेतली. आयसीसीने ट्विटरवर फिलिप्सच्या या शॉटचा व्हिडिओ शेअर करत 'या शॉटचे नाव' विचारले. ग्लेनचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या शॉटला विविध नाने देण्यात आली, यात भारतीय चाहत्याने या शॉटला 'अजित पवार शॉट' असे नाव दिले आहे.