आता मोबाईल कॉलिंग रेटमध्ये दरवाढ ; आता मोजावे लागणार इतके पैसे

02 Dec 2019 16:15:14


saf_1  H x W: 0

 


मुंबई : मोबाईल कॉलिंग आणि इंटरनेटचे दर वाढणार असल्याने ग्राहकांच्या खिशाला ३ डिसेंबरपासून कात्री लागणार आहे. त्यामुळे आता देशात स्वस्त कॉलिंगचा टप्पा संपुष्टात येणार आहे. भारती एअरटेल, व्होडाफोन आयडियाने रिचार्जचे दर ५० टक्क्यापर्यंत वाढविण्याचे जाहीर केले आहे. तर, रिलायन्स जिओने रिचार्जचे दर ४० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे रविवारी जाहीर केले. रविवारी दूरसंचार कंपन्यांनी नवी प्लॅन सादर केले आहेत. या नवीन प्लॅनमध्ये कॉल दरांसह इंटरनेट डेटाचे दर वाढवण्यात आले आहे.

 

दूरसंचार कंपन्यांमधील तीव्र स्पर्धेमुळे गेल्या ५ वर्षात मोबाईल कॉलिंग आणि इंटरनेटचे दर वाढले नव्हते. २०१४ नंतर ग्राहकांना कॉलिंगचा दर जवळपास शून्य आहे. तर इंटरनेटच्या वापराचा दर २०१४ पासून ९५ टक्क्यांनी घसरला. २०१४ मध्ये एक जीबीसाठी २६९ रुपये मोजावे लागत होते. त्यासाठी ग्राहकाला सध्या ११ रुपये ७८ पैसे मोजावे लागतात. भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयिडियाने त्यांनी अमर्यादित श्रेणीतील नवे दर जाहीर केले आहेत. हे दर पूर्वीच्या प्रिपेड प्लॅनहून ५० टक्क्यापर्यंत अधिक आहेत. नवीन दर उद्यापासून लागू होणार आहेत. तर रिलायन्सने अर्मायिदत कॉलिंग आणि डाटाचे दर ४० टक्क्यापर्यंत वाढविले आहेत. हे नवे दर ६ डिसेंबरपासून लागू होणार आहेत.

 

व्होडाफोन-आयडियाने रविवारी प्रीपेड सेवांसाठी २, २८, ८४ आणि ३६५ दिवसांची वैधता असणारे नवी प्लॅन जारी केले. हे प्लॅन जुन्या प्लॅनपेक्षा ४० टक्क्यांनी महाग आहेत. एअरटेलचा टॅरिफ प्रतिदिन ५० पैशांपासून २.८५ रुपये इतके महाग झाले आहे. व्होडाफोन-आयडियाने ऑफ नेट कॉल मर्यादा निश्चित केली आहे. तर एअरटेलने निश्चित सीमेपेक्षा जास्त वेळ ऑफ नेट कॉल केल्यास ६ पैसे प्रति मिनिटाचे शुल्क वसुल करणार असल्याचे सांगितले.

Powered By Sangraha 9.0