नवी दिल्ली : डीआरडीओने आज दुपारी 'पिनाका' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. ओडिशाच्या किनारपट्टी परिसरात चांदीपूर रेंजमधून ही चाचणी घेण्यात आली. 'पिनाका' ही एक तोफखाना प्रकारात मोडणारे क्षेपणास्त्र आहे. ज्याची मारक क्षमता ७५ कि.मी.पर्यंत आहे. यापूर्वी राजस्थानच्या पोखरणमध्येही १२ मार्च २०१९ रोजी त्याची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. चाचणी दरम्यान, क्षेपणास्त्राने अचूक लक्ष्य सध्या केले आणि इच्छित यश संपादन केले.