शरद पवार यांची पुन्हा गुगली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Dec-2019
Total Views |


pawar_1  H x W:



मुख्यमंत्री ठाकरे
, राहुल गांधी यांना एकाच वेळी चिमटे


नागपूर : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आज पत्रकारांशी बोलताना एकाच वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना चिमटे काढल्याने शरद पवार आता काय नवीन डाव खेळणार, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. हे सरकार पाच वर्षे टिकेल, असे सांगतानाच शरद पवारांनी ही गुगली टाकल्याने राजकीय नेते चक्रावले आहेत.



आज बुधवारी दुपारी शरद पवार यांनी देवगिरी बंगल्यावर पत्रकारांशी दिलखुलास गप्पा मारल्या
. त्यावेळी त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरे देताना उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांना चिमटे घेतले. “जालियनवाला बाग वक्तव्य म्हणजे गाडी लायनीवर आली,” असा चिमटा त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नाव न घेता काढला, तर “देशाला पर्याय हवा आहे, पण जो पर्याय पुढे केलाय तो सतत देशाबाहेरच असतो,” असा जोरदार टोला त्यांनी राहुल गांधींचे नाव न घेता मारला. “या देशात सध्या जे चालू आहे ते योग्य नाही,” असे सांगत त्यांनी नागरिकत्व कायद्यावर सर्व मोदी विरोधकांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. त्याचवेळी, “हा कायदा जनतेला समजावून सांगण्यात सरकार कमी पडले आहे,” असेही त्याच ओघात सांगितले.



“स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल मला आदर आहे, मी त्यांच्यावर भाषणे केली आहेत. त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन मान्य आहे, तो अधिक सांगावा लागेल. मात्र, त्यांचे हिंदुत्व मान्य नाही,” असे शरद पवार यांनी सांगितले. “अत्रेंनी नवयुगमध्ये सावरकरांवर लिहिलेल्या लेखाचा संदर्भ आपण नेहमी देतो,” असेही ते म्हणाले. “उद्धव ठाकरे यांना हिंमत द्यावी लागते, ती आम्ही सगळे मिळून त्यांना देतो, मग ते ठाम उभे राहतात,” असेही शरद पवार यांनी सांगितले.

@@AUTHORINFO_V1@@