थंडीच्या दिवसात, दूर करा संधिवात !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Dec-2019
Total Views |


हिवाळ्याची चाहूल ही सर्वांनाच सुखावणारी असते. परंतु अनेकदा हा काळ म्हणजे वेगवेगळ्या शारीरिक वेदनांची सुरुवात असते. यासाठी आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे औषधी वनस्पती वापरून सिद्ध केलेले आणि असंख्य रुग्णांनी वापरून नावाजलेलं गुणकारी उत्पादन म्हणजे पितांबरीचं 'क्युअरऑन प्लस' पेन रिलिफ ऑइल.

 

a_1  H x W: 0 x 
 
 

ऑक्टोबर हीट नंतर येणाऱ्या हिवाळ्याची चाहूल ही सर्वांनाच सुखावणारी असते. परंतु अनेकदा हा काळ म्हणजे वेगवेगळ्या शारीरिक वेदनांची सुरुवात असते. कारण इथपासून थंडीचा कालावधी सुरु होत असतो. सांधेदुखी, पाठदुखी या थंडीमध्ये आढळणाऱ्या प्रमुख समस्या आहेत. याला कारणं अनेक आहेत. पण मुख्य कारण म्हणजे सांध्यांमधील वंगण कमी होणे आणि स्नायू कमकुवत झाल्याने त्यांची सांधे धरून ठेवण्याची ताकद कमी होणे. या आणि अशा अनेक कारणांमुळे वेगवेगळ्या प्रकारची दुखणी सुरु होतात ज्याला सर्वसाधारणपणे संधिवात म्हटलं जातं. शरीरातल्या सर्व संधींमध्ये अर्थात जॉईन्ट्समध्ये वातदोष शिरल्याने होणारी दुखणी म्हणजे संधिवात ! अशी थोडक्यात संधिवाताची व्याख्या करता येईल.

 

या सर्व दुखण्यांकडे दुर्लक्ष केलं जातं किंवा वेदनाशामक गोळ्या, मलम यांसारखे तात्पुरते उपाय केले जातात. परंतु त्यासाठी योग्य आहार घेऊन आणि आवश्यक व्यायाम योग्य प्रकारे करतानाच त्याला बाह्यउपचारांची जोड द्यायला पाहिजे. बाह्यउपचारासाठी आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे औषधी वनस्पती वापरून सिद्ध केलेले आणि असंख्य रुग्णांनी वापरून नावाजलेलं गुणकारी उत्पादन म्हणजे पितांबरीचं क्युअरऑन प्लस पेन रिलिफ ऑइल. यातला मुख्य घटक म्हणजे तीळ तेल. कारण ते त्वचेत सहज आणि चटकन जिरते तसेच आपल्याबरोबर इतर वनौषधींनाही वेदनेच्या मुळापर्यंत पोहचवते. शिवाय तीळ तेलामध्ये शरीरासाठी पोषक विटामिन मुबलक प्रमाणात असते. त्याशिवाय अश्वगंधा, गंधपुरव, सहचर, रुई, फूल, शतावरी, निर्गुडी आदी औषधी वनस्पतींसोबतच यामध्ये एरंडमूळ आणि कुचला या दोन वनौषधींचा अंतर्भाव केला असल्यामुळे संधिवाताबरोबरच आमवात या विकारावरही क्युअरऑन प्लस हे प्रभावी आहे.

 

हे रोलऑन स्वरूपातही उपलब्ध असल्याने प्रवासात सोबत ठेवण्यासाठीही ते उपयुक्त आहे. पाठ, कंबर दुखत असेल तर स्वतःला क्युअरऑन लावणं यामुळे शक्य होतं. त्याचप्रमाणे रोलऑनचा वापर करत असतानाच स्वाभाविकपणे मसाजही होतो. रोलऑन फॉर्ममुळे तेल सांडण्याचीही भीती नाही. शिवाय यात कोणताही कृत्रिम रंग नसल्याने याचा कपड्यांवर डाग पडत नाही. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करताना अचानक उद्भवणाऱ्या दुखण्यांमध्येही क्युअरऑन प्लस त्वरित आराम देते. व्हेरिकोज व्हेन्स सारख्या त्रासातही क्युअरऑन प्लस नियमितपणे लावल्यास निश्चितपणे परिणाम दिसून येतो. अशा प्रभावी क्युअरऑन प्लसमुळे आता हिवाळादेखील आनंदाची पर्वणी ठरेल यात शंका नाही.

 

b_1  H x W: 0 x 
@@AUTHORINFO_V1@@