मोदीजी आता तुम्हीच कर्जमाफी करा!

    दिनांक  17-Dec-2019 17:40:30
|

od_1  H x W: 0


नागपूर : राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य सरकारने हजार ६०० कोटी रुपये मंजूर केले असून यापैकी हजार १०० कोटी रूपये वितरित करण्यात आले आहेत. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या मदतीसाठी आणि पूरग्रस्तांच्या मदतीकरिता राज्य सरकारने १४ हजार ६०० कोटी रुपयांची मागणी मोदी सरकारकडे केली आहे, अशी माहिती अर्थमंत्री जयंत पाटील यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.

 

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची मागणी विरोधी पक्षांनी केल्यानंतर त्याला उत्तर देताना अर्थमंत्री बोलत होते. ते म्हणाले की, राज्य सरकारमार्फत मदतीचे वाटप सुरू आहे. मंजूर केलेल्या हजार ६०० कोटी रुपयांपैकी हजार १०० कोटी रुपये जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वितरित केले आहेत. उर्वरित रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे.

 

राज्य शासनाने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हजार ४०० कोटी रूपये तर अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हजार २०० कोटी रुपये अशी एकूण १४ हजार ६०० कोटी रुपयांची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. राज्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकार वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाही अर्थमंत्र्यांनी यावेळी दिली.