विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी प्रवीण दरेकर

16 Dec 2019 12:02:20
Pravin _1  H x
 


मुंबई : विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदी आमदार प्रवीण दरेकर यांना संधी देण्यात आली आहे. भाजपतर्फे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दरेकर यांच्या नावाची घोषणा केली. या पदासाठी सुरजितसिंह ठाकूर, भाई गिरकर यांची नावे आघाडीवर होती. मात्र, अखेर दरेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहेत.

 

प्रवीण दरेकर हे मुंबईतील मागाठणे मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. विधानपरिषदेवर ते पहिल्यांदाच निवडून गेले आहेत. प्रवीण दरेकर हे भाजपचे प्रवक्ते म्हणून माध्यमांसमोर बाजू मांडताना दिसतात. सहकार क्षेत्रातील दांडगा अनुभव त्यांच्याकडे आहे.

Powered By Sangraha 9.0