‘तान्हाजी’विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका

    16-Dec-2019
Total Views |

tanhaji_1  H x


सध्या चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक चित्रपटांचे पीक आहे. ‘बाजीराव मस्तानी’, मणीकर्णिका’,‘पद्मावत’नंतर आता नुकताच प्रदर्शित झालेला ‘पानिपत’ आणि येत्या काही दिवसांत प्रदर्शित होणारा ‘तान्हाजी’... ऐतिहासिक चित्रपट आणि वाद हे एक समीकरणच तयार झाले आहे.


अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला ‘तान्हाजी : द अनसंग वॉरीयर’ या चित्रपटाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. अखिल भारतीय क्षत्रिय कोळी राजपूत संघाने या चित्रपटाविरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. तान्हाजी मालुसरेंच्या घराण्याबद्दल आणि वंशाबद्दल खरी माहिती दाखविली गेली नसल्याचा आरोप तान्हाजी मालुसरेंचे १४ वे वशंज प्रसाद मालुसरे यांनी केला आहे.


तान्हाजी या चित्रपटात दाखवला जाणारा इतिहास पुढची पिढी लक्षात ठेवेल, या चित्रपटात काही दृश्यात तान्हाजींचे हात साखळदंडाने बांधलेले दाखवले गेले आहेत. परंतु आतापर्यंत हा प्रसंग कधी ऐकला नाही किंवा इतिहासात याची कुठेच नोंद दिसत नाही. त्यामुळे या चित्रपटातून हे दृश वगळण्यात यावी अशी मागणी ही प्रसाद मालुसरे यांनी केली.