‘द आयर्न लेडी इन अ‍ॅडव्हर्टायझिंग’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


tara _1  H x W:


स्वत:ची जाहिरात संस्था स्थापणारी पहिली भारतीय महिला कोण? या प्रश्नाचे निर्विवाद उत्तर एकच येते तारा सिन्हा. त्यांची निधनवार्ता बुधवारी आली, तेव्हा एक धडाडीचे व्यक्तिमत्त्व लोपले, अशीच सर्वसाधारण प्रतिक्रिया होती. जाणून घेऊया ‘द आयर्न लेडी इन अ‍ॅडव्हर्टायझिंग’ तारा सिन्हा यांच्याविषयी...भारतीय जाहिरात क्षेत्रांची दारे महिला व्यावसायिकतेसाठी खुले करणार्‍या तारा सिन्हा धनबादमधील चिरंजीवलाल आणि सीता पसरिचा या दाम्पत्याच्या कन्या होत्या
. त्यांची शिकण्याची जिद्द व त्याला पालकांची साथ यामुळेच वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी अमेरिकेत जाऊन जाहिरात कला व संज्ञापन कला याविषयात पदवी घेतली. हे कार्यदेखील धडाडीचेच म्हणावे लागेल. सिन्हा यांनी आपली जाहिरात व संज्ञापन या विषयातील पदवी, केंब्रिज स्कूल प्रमाणपत्र (यूके) आणि ‘सीएएम डिप्लोमा अ‍ॅडव्हर्टायझिंग असोसिएशन, ब्रिटन’, ‘चार्टर्ड इन्स्टिट्यूट ऑफ मार्केटिंग, यूके’ हे सर्व शिक्षण अशावेळी पूर्ण केले जेव्हा भारतीय महिलांसाठी माध्यमिक शिक्षणदेखील एक खूप दुर्मीळ बाब होती.१९५५ मध्ये भागीदारीत जाहिरात संस्था स्थापन केली
. सिन्हा यांनी आपल्या करिअरची सुरुवात कोलकाताच्या ‘एस. एच. बेन्सन’ची भारतीय साहाय्यक कंपनी ‘डी. जे. बाईमर’पासून केली. तथापि, बेन्सन यांनी १९५५मध्ये आपली कोलकत्यामधील कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला. यामुळे या कंपनीत काम करणार्‍या सहकार्‍यांसह तारा यांनी भागीदारीत जाहिरात कंपनी स्थापण्याचा निर्णय घेतला. ‘क्लॅरियन तारा’ या कंपनीच्या संचालक झाल्या. वयाच्या २३ व्या वर्षी सिन्हा एका जाहिरात एजन्सीच्या प्रमुख मानाच्या पदावर होत्या.१९७३ साली त्या मुंबईत दाखल झाल्या
. येथे त्या ‘कोकाकोला एक्स्पोर्ट कॉर्पोरेशन’च्या भारतीय कार्यालयात रुजू झाल्या. १९७७ साली या अमेरिकी पेयावर भारतात बंदी घातली. ‘कोक’च्या अमेरिकी कंपनीने तारा यांच्यासह काही वरिष्ठांना अमेरिकेत काम करण्याचा प्रस्ताव दिला. इथे रुजू होताच त्यांची नियुक्ती अटलांटिका, जॉर्जिया येथील मुख्यालयात झाली व त्यांनी त्या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला. तेथील कामाने तारा यांना आंतरराष्ट्रीय अनुभव दिला. पण १९८४-८५ साली त्या पुन्हा ‘क्लॅरियन’मध्ये परतल्या. तेथे पटेनासे झाल्यामुळे रुजू झाल्याच्या १८ महिन्यांतच कंपनीने त्यांना कामावरून दूर केले. येथे त्यांच्यातील धडाडीला चालना मिळाली व त्यांनी स्वतःची एजन्सी सुरू करण्याचा निर्णय घेतला. ‘क्लॅरियन’ ही संस्था सोडल्यानंतरही त्यांच्याशी संस्थेच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या ग्राहकवर्गने तारा यांच्याशीच व्यवहार करणे हिताचे समजले. त्यातूनच त्यांना आपली संस्था स्थापन करण्याची प्रेरणा मिळाली असावी. १९८४ मध्येच त्यांनी दिल्लीत ‘तारा सिन्हा असोसिएशन’ची स्थापना करत पहिली भारतीय महिला जाहिरातदार संस्था स्थापन करण्याचा बहुमान मिळवला. एकाच वर्षात त्यांनी आपल्या संस्थेच्या कार्याला चालना देत दोन सहयोगी संस्थांची स्थापना केली त्या ‘एडमर’ आणि ‘रिझल्ट.’ याच संस्थेच्या प्रमुख संचालक म्हणून त्यांनी आपली सेवानिवृत्ती घेतली.सेवानिवृत्तीच्या वेळी त्या
तारा सिन्हा मॅककॉन अ‍ॅरिक्सन प्रायव्हेट लिमिटेड’च्या अध्यक्षा व सीईओ होत्या. ‘एडमर’ आणि ‘रिझल्ट’ या संथांच्यादेखील अध्यक्षा होत्या. तारा या जाहिरात व्यवस्थापन क्षेत्रात कर्तबगार होत्या. उत्पादकांना योग्य सल्ला देणे, कोणत्या माध्यमांतून कशी जाहिरात केल्यास परिणामकारकता वाढेल हे ठरविणे आदी कामांसाठी त्या ओळखल्या जात. वयपरत्वे त्या कामापासून दूर गेल्या आणि मागील सहा महिनांपासून त्या आजारीच होत्या.त्यांच्याविषयी बोलताना
ओगल्वी अ‍ॅण्ड माथेर आणि मॅककॅन वर्ल्ड ग्रुप’मध्ये वरिष्ठ पदावर असलेले मीडिया सल्लागार चिंतामणी राव म्हणाले, “त्या भारतातील जाहिरात व्यावसायिकांच्या पहिल्या पिढीचे नेतृत्व आहेत. त्यांच्या कर्तृत्वाने त्यांना सुभाष घोसाळ, सुब्रोटो सेनगुप्ता आणि आर. के. स्वामीच्या पंक्तीत नेऊन ठेवले. जरी त्या वयाने खूपच लहान होत्या.” ‘हिंदुस्तान थॉम्सन असोसिएट्स’ आणि ‘जे. वॉल्टर थॉम्सन’चे माजी जाहिरात व्यावसायिक आणि दिग्गज छायाचित्रकार रोहित चावला म्हणाले, “तारा सिन्हा यांनी जाहिरातीत मूळ ‘स्टार्ट-अप’ संस्कृतीची पायाभरणी केली.”एका प्रसिद्ध
‘जाहिरात गुरु’च्या रूपात अनेक विद्यार्थ्यांच्या आदर्श असणार्‍या तारा सिन्हा भारतीय जाहिरातीच्या क्षेत्राबरोबरच ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन’, नवी दिल्लीच्या अध्यक्षा होत्या. ‘आयआयटी, दिल्ली’च्या सल्लागार समितीत त्या होत्या. त्यासोबतच ‘गव्हर्निंग काऊंसिल ऑफ इंडिया हॅबिटेट सेंटर’, ‘चार्टर्ड इन्स्टिट्यूट ऑफ मार्केटिंग, यूके,’ ‘दिल्ली अ‍ॅडव्हर्टायझिंग क्लब’, ‘भारत मार्केट रिसर्च सोसायटी,’ यूके, ‘द असोसिएशन ऑफ़ क्वॉलिटेटिव्ह रिसर्च प्रॅक्टिशनर्स, यूके’ यांसारख्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांच्या त्या सदस्या होत्या.जाहिरात क्षेत्राचा ५० वर्षांहून अधिक काळ अनुभव असणार्‍या कारकिर्दीत त्यांनी
‘कोका-कोला’, ‘नेस्ले’ आणि ‘जिलेट’सहित बहुराष्ट्रीय व भारतीय जाहिरात क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कंपन्यांची जबाबदारी सांभाळली आहे. जाहिरात म्हटले की ‘अलेक पदमसी’ ते ‘प्रसून पांडे’पर्यंतच्या जाहिरातकारांची नावे आठवतात. कारण, त्यांचे कार्यक्षेत्र हे सृजनशील होते. त्यांना कायम प्रसिद्धीच्या झोतात आणणार्‍या सृजनशील जाहिराती ‘अलेक पदमसी’सारख्या जाहिरातदारांनी बनवल्या. त्या तुलनेत तारा सिन्हा यांचे नाव तितकेसे परिचित नाही. तरीही जाहिरात व्यवस्थापन क्षेत्रातील एक धडाडीची महिला म्हणून त्यांचे नाव तितकेच आदराने घेतले जाते. अशा या धाडसी महिलेची निधन वार्ता बुधवारी आली. तेव्हा एक धडाडीचे व्यक्तिमत्त्व हरपले, अशीच सर्वसाधारण प्रतिक्रिया जाहिरात क्षेत्रातून आली. भारतीय जाहिरात व संज्ञापन क्षेत्रात ‘महिला स्टार्ट-अप’ संस्कृतीची पायाभरणी करणार्‍या या तेजस्वी तारकेला दै. ‘मुंबई तरुण भारत’ची भावपूर्ण श्रद्धांजली!

@@AUTHORINFO_V1@@