मृणाल कुलकर्णी यांना यंदाचा ‘स्मिता पाटील कौतुक पुरस्कार'

15 Dec 2019 20:32:32


mrinal_1  H x W


मुंबई
: मराठी भाषेचा ‘उंबरठा’ ओलांडत सशक्त अभिनयाने हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या 33व्या पुण्यतिथी दिनाच्या निमित्ताने ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते तिसरा ‘स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार’ अभिनेत्री दीप्ती नवल यांना प्रदान करण्यात आला. तसेच ‘स्वर्गीय स्मिता पाटील कौतुक पुरस्कारने अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना गौरविण्यात आले.



विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात झालेल्या भव्य सोहळ्यामध्ये प्रदान करण्यात आला
. अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन आमदार अ‍ॅड. पराग अळवणी, आर्च एंटरटेनमेंटचे विनीत आणि अर्चना गोरे, जीवनगाणीचे प्रसाद महाडकर आणि स्मिताची जवळची मैत्रीण ललिता ताम्हणे यांनी केले होते. ‘स्वर्गीय स्मिता पाटील पुरस्कार २०१९’ सोहळ्याचे हे तिसरे वर्ष आहे.

Powered By Sangraha 9.0