'जामिया मिलिया’च्या विद्यार्थ्यांचा दक्षिण दिल्लीत हैदोस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Dec-2019
Total Views |


jamia_1  H x W:


नवी दिल्ली : नव्या नागरिकत्व कायद्याला विरोध करीत जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी रविवारी दक्षिण दिल्लीतील मथुरा मार्गावर हैदोस घालत काही बस पेटवून दिल्या. या वेळी आंदोलक विद्यार्थी आणि दिल्ली पोलिसांमध्ये संघर्षही झाला. विद्यार्थ्यांनी न्यू फ्रेंड्स कॉलनी येथे दिल्ली ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या चार बस, पोलिसांची दोन वाहने आणि अग्निशमन दलाचा बंब जाळला. विद्यार्थ्यांनी केलेल्या हल्ल्यात सहा पोलीस आणि दोन अग्निशमन दलाचे कर्मचारी जखमी झाल्याचा दावा पोलिसांनी केला.


जामिया मिलिया इस्लामियाचे विद्यार्थी नव्या नागरिकत्व कायद्याला विरोध करीत असताना दिल्लीत हिंसाचारास सुरुवात झाली
. मात्र, झालेल्या हिंसाचारात आपला हात नसल्याचा दावा ‘जामिया’च्या विद्यार्थी संघटनेने केला. निदर्शनांमध्ये घुसलेल्या काही असामाजिक तत्त्वांनी हा हिंसाचार घडवल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला.


घटनास्थळावर चार बंब पाठवण्यात आले होते
. लावलेल्या आगीत एका बंबाचे पूर्णतः नुकसान झाले, अशी माहिती दिल्ली अग्निशमन विभागाच्या अधिकार्‍याने दिली. अग्निशमन विभागाच्या कर्मचार्‍यांनी पेटवून दिलेल्या बसची आग विझवताना घटनास्थळावरून धुराचे लोट उसळत होते. आंदोलकांनी शांततेने निदर्शने करावीत. कोणत्याही प्रकारचा हिंसाचार स्वीकारार्ह नाही, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. हिंसाचार सुरू झाल्याची माहिती कळताच दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनने सुखदेव विहार येथील मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार ;बंद केले, अशी माहिती काँग्रेसची राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेचे (एनएसयूआय) राष्ट्रीय चिटणीस सायमन फारुकी यांनी दिली. आंदोलक विद्यार्थी मथुरा मार्गावर शांततेने निदर्शने करीत होते. मात्र, पोलिसांनी दोन विद्यार्थ्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांनी त्यास विरोध सुरू केला. त्यानंतर पोलिसांनी लाठीहल्ला करीत विद्यार्थ्यांवर अश्रुधुराचे गोळे डागले, असे त्यांनी सांगितले.

 

 
हिंसाचारामागे आपचा हात : भाजप


दक्षिण दिल्लीत झालेल्या हिंसाचारात आम आदमी पार्टीचा हात असल्याचा आरोप भाजपाने केला
. आपचे आमदार लोकांना चिथावणी देत होते. या हिंसाचारामागे अरविंद केजरीवाल यांचा हात आहे, असे ट्विट दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी केले. केजरीवालांच्यावतीने आपचे आमदार अमानतुल्ला खान लोकांना चिथावणी देत आहेत. भारतातील मुस्लीम देशासोबत आहेत, ते तुमच्या चिथावणीला बळी पडणार नाही. आपचे पाप उघड झाले आहे, असे ट्विट त्यांनी हिंदी भाषेत केले.

@@AUTHORINFO_V1@@