आरोग्यसेविकांचे ‘अच्छे दिन’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Dec-2019
Total Views |


bmc_1  H x W: 0


मुंबई : वर्षानुवर्षे तुटपुंज्या पगारावर काम करणाऱ्या महापालिकेच्या हजारो आरोग्यसेविकांना जानेवारीपासून १० हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. गटनेत्यांच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. आरोग्यसेविकांना यामुळे दिलासा मिळणार आहे.


महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यात सुमारे चार हजार आरोग्यसेविका काम करतात
. पोलिओ डोस पाजणे, आरोग्याशी निगडित विविध मोहिमांमध्ये त्यांना सहभाग करून घेतले जाते. या माध्यमातून त्यांना कामे करावी लागत आहेत. मात्र, या कामासाठी त्यांना चार ते पाच हजारांचे तुटपुंजे मानधन मिळत होते. या पगारात वाढ करावी अशी मागणी मागील अनेक महिन्यांपासून प्रशासनाकडे करण्यात येत होती. नुकत्याच झालेल्या महासभेत आरोग्य सेविकांना मासिक मानधन दहा हजार रुपये देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. आता गटनेत्यांच्या बैठकीत यासंदर्भातील प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. डिसेंबर २०१९मध्ये आरोग्य सेविकांना ९ हजार रुपये तर जानेवारी २०२० पासून १० हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@