सरपंचपदाच्या या खुर्चीत कोणाची होणार सरशी?

14 Dec 2019 18:47:35

dhurala_1  H x



'#पुन्हानिवडणूक?' या वादग्रस्त हॅशटॅगमुळे चर्चेत आलेल्या 'धुरळा' या चित्रपटाचा ट्रेलर शुक्रवारी प्रदर्शित झाला. टीझर लॉन्चपासून या चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. राजकारणावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.




गाव
, गावतलं राजकारण, सरपंचपदाची खुर्ची आणि यासाठी उडवलेला 'धुरळा' या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतोय. या चित्रपटात अल्का कुबल, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक, अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, उमेश कुलकर्णी, अमेय वाघ हे कलाकार मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत.


गावाकडच्या मातीत मुरलेलं राजकारण, निवडणुकांची रणधुमाळी आणि या सत्तेच्या या खेळात एकमेकांवर कुरघोडी करताना उडालेला राजकारणाचा 'धुरळा' हे सगळेच पैलू या ट्रेलरमध्ये उलगडण्यात आले आहेत. ३ जानेवारी २०२० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Powered By Sangraha 9.0