
मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 'मी राहुल सावरकर नाही' या वक्तव्यावरून राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधींच्या वक्तव्याचा समाचार घेत फडणवीस म्हणाले कि,"काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे विधान अतिशय निंदनीय आहे. ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नखाची सुद्धा बरोबरी करू शकत नाही आणि स्वतःला 'गांधी' समजण्याची घोडचूक तर त्यांनी अजिबात करू नये! केवळ आडनाव गांधी असल्याने कुणी 'गांधी' होत नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे !", अशा तीव्र शब्दात त्यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध केला.