किमान वेळात विजयासाठी लष्कराची पुनर्रचना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Dec-2019
Total Views |

p_1  H x W: 0 x


मुंबई :अत्यंत कमी वेळेत शत्रूला मात देऊन विजयासाठी भारतीय लष्कराची पुनर्रचना करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सामरिक उद्दिष्ट गाठण्यासाठी हे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी केले.


माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या स्मृतिनिमित्त
‘फोरम फॉर इंडिग्रेटेड नॅशनल सिक्युरिटी’ यांच्यावतीने ‘भारताचा सुरक्षा दृष्टिकोन - २०३०’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन शनिवार, दि. १४ डिसेंबर रोजी मुंबई विद्यापीठाच्या कालिना कॅम्पसमधील ‘ग्रीन ऑडिटोरियम’मध्ये करण्यात आले होते. भारतीय लष्करप्रमुख बिपीन रावत, संरक्षण संशोधन व विकास संस्था-डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. जी. सतीश रेड्डी, ‘फोरम फॉर इंटिग्रेटेड सिक्युरिटी’चे अध्यक्ष लेफ्टनंट जनरल (नि.) दत्तात्रय शेकटकर, सेक्रेटरी जनरल अ‍ॅड. बाळ देसाई व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर यावेळी उपस्थित होते. लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी यावेळी प्रमुख संबोधनात वरील प्रतिपादन केले.


भारतीय सैन्यदले
, भारतीय सीमा सुरक्षा आदींचे येत्या ५ ते १० वर्षांतील चित्र स्पष्ट करताना ते म्हणाले की, “लष्कराच्या तिन्ही सैन्यदलांनी एकत्रितपणे काम केल्यास भविष्यातील सुरक्षाविषयक आव्हानांचा सामना करणे प्रभावी ठरेल. नव्या युगात तुमच्याकडे सैन्यसंख्या कमी असली तरी वा ती कमीच असावी; कारण आता तंत्रज्ञानाला महत्त्व आहे. तुमची सैन्यशक्ती आधुनिक तंत्रज्ञानाने किती सज्ज आहे, त्यावर ती जगातली सर्वात मोठी, दर्जेदार सेना ठरू शकते. म्हणूनच भारतीय सैन्याची वाटचाल त्याच दिशेने सुरू आहे. आम्ही आधुनिक तंत्रज्ञान, नवनवीन कल्पनांचा स्वीकार सैन्यदलांमध्ये करत आहोत. त्यातूनच सैन्यदलांची क्षमता वाढेल आणि त्यासाठी शैक्षणिक संस्था, औद्योगिक क्षेत्र, लघुउद्योग, स्टार्टअप आदींशी संपर्काची गरज आहे. जगात सध्या चीन व अमेरिका आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटच्या माध्यमातून आपली सैन्यक्षमता वाढवत आहेत. भारतही त्या दिशेने वाटचाल करत आहे. तसेच भविष्यातील युद्धे अंतराळात लढली जातील. भारत आपल्या डिफेन्स स्पेस एजन्सीच्या साहाय्याने भारत त्या दिशेनेही काम करत आहे,” असे ते म्हणाले.


मनोहर पर्रिकर यांच्याबद्दल रावत म्हणाले की
, “मनोहर पर्रिकरांचे व्यक्तिमत्त्व अतिशय साधे होते. पण ते जसे राजकीय विचारक होते त्याचप्रमाणे ते उत्तम मिलिटरी स्ट्रॅटेजिस्टदेखील होते. मनोहर पर्रिकरांनी जे ध्येय पाहिले त्याच मार्गाने २०३० पर्यंत भारतीय सैन्यदले वाटचाल करणार आहेत. पर्रिकरांनी डिफेन्स इकोसिस्टीमची निर्मिती केली व त्याची फळे देशाला मिळत आहेत. भारतीय सैन्यदले व्यावसायिक व तंत्रज्ञानविषयात दर्जेदार व सक्षम असावीत, ही त्यांची इच्छा होती.”कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर यांनी यावेळी पर्रिकरांची आठवण सांगितली. तसेच मुंबई विद्यापीठातील विविध उपक्रमांची माहिती दिली.

@@AUTHORINFO_V1@@