टीएमसी खासदार महुआ यांची 'ही' मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Dec-2019
Total Views |



TMC Mp_1  H x W


नागरिकत्व संशोधन विधेयकावर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार


नवी दिल्ली: संसदेने नुकतेच पारित केलेल्या बहुचर्चित नागरिकता संशोधन विधेयकाला आव्हान देणारी याचिका टीमसी खासदार महुआ मोइत्रा यांनी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने मात्र तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. कॉंग्रेसचे जयराम रमेश यांनीही याविषयी याचिका दाखल केली आहे.


सरन्यायाधीश शरद बोबडे, न्या. बी. आर. गवई आणि न्या. सूर्य कांत यांच्या न्यायपीठासमोर, आज सकाळी तातडीने सुनावणी घेण्याची विनंती याचिकाकर्त्यांच्या वतीने करण्यात आली होती. त्यानंतर येत्या सोमवारी हे प्रकरण सुनावणीसाठी घ्यावे, अशीही विनंती करण्यात आली.

छळ-अत्याचाराला कंटाळून पाकिस्तान, बांगलादेश व अफगणिस्तान या देशांतून भारतात शरण घेण्यास आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी धर्माच्या मंडळींना नागरिकत्व देण्याची तरतुद नागरिकत्व कायद्यात करण्यात आली आहे. याविषयीचे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांनी नुकतेच पारित केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@