राणेंच्या रणनीतीपुढे शिवसेना पराभूत, पोटनिवडणुकीत भाजपचाच झेंडा

13 Dec 2019 16:43:45




NITESH _1  H x


भाजपचे लॉरेन्स म्यानेकर विजयी; नितेश राणेंनी केले अभिनंदन


कोकण (प्रतिनिधी):  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंब्रड जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणूकीत भाजपचे लाँरेन्स मान्येकर २ हजारच्या प्रचंड मताधिक्याने विजयी झाले. विजयी उमेदवार लाँरेन्स मान्येकर यांचे आमदार नितेश राणे यांनी कुडाळ येथे जाऊन अभिनंदन केले आहे. 


कणकवली विधानसभेतील शिवसेनेचे पराभूत उमेदवार सतीश सावंत यांच्या राजीनाम्यामुळे जिल्हा परिषदेची जागा रिक्त झाली होती. भारतीय जनता पक्षाच्या वतीने लॉरेन्स मान्येकर निवडणूक लढत होते. शिवसेनेला जागा राखणे जमले नाही. जिल्हा परिषद जागेवर शिवसेना महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत या निवडणूक लढवत होत्या. जान्हवी सावंत यांचा दारुण पराभव झाला आहे. भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या प्रचंड मेहनतीने ही विजयश्री खेचून आणली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणेंचा दबदबा आजही कायम असल्याचे ह्या विजयातून निश्चित झाल्याचे समजते. स्वतःची जागा गमावल्यामुळे शिवसेनेच्या गोठात मात्र नाराजी आहे.
Powered By Sangraha 9.0