केंद्र सरकारचा हस्तकला पुरस्कार मिळवण्यासाठी 'येथे' करा अर्ज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Dec-2019
Total Views |



hk_1  H x W: 0



‘शिल्प गुरू  व राष्ट्रीय हस्तकला पुरस्‍कार-२०१८’ याकरिता अर्ज आमंत्रित करण्‍यात येत आहे


विशेष वृत्त : केंद्रीय वस्‍त्रोद्योग मंत्रालयाच्‍या विकास आयुक्‍त (हस्‍तकला) यांच्‍या कार्यालयअंर्तगत नागपूर येथील हस्‍तकला विकास केंद्रातर्फे हस्तकला कारागिरांच्या श्रेणीसाठी ‘शिल्प गुरू व राष्ट्रीय हस्तकला पुरस्‍कार-2018’ याकरीता अर्ज आमंत्रित करण्‍यात येत आहे. सदर पुरस्‍काराठी सेमीनरी हिल्‍स येथील सी.जी.ओ. संकुलातील हस्‍तकला सेवा केंद्राच्‍या कार्यालयात 31 डिसेंबर 2019 पर्यंत विहित नमुन्‍यातील अर्ज कार्यालयीन वेळेत दाखल करणे आवश्‍यक आहे.

‘शिल्प गुरु पुरस्‍कार’ या श्रेणीत अर्ज स्‍वीकार होण्‍यासाठी अर्जदाराचे वय 50 वर्ष तसेच हस्तकला क्षेत्रात 20 वर्ष कामाचा अनुभव आवश्यक आहे. ‘राष्ट्रीय पुरस्कार’ या श्रेणीत अर्ज स्‍वीकार होण्‍यासाठी अर्जदाराचे वय 30 वर्ष तसेच हस्तकला क्षेत्रात 10 वर्ष कामाचा अनुभव आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी हस्‍तकला सेवा केंद्राचे वरिष्‍ठ सहायक संचालक श्री. एस.आर. मसराम (0712-2510684) / 9975079091) तसेच केंद्राचे हस्‍तकला प्रोत्‍साहन अधिकारी श्री. सुरेश तांडेकर (8698914515) यांना संपर्क करण्‍याचे आवाहन हस्‍तकला सेवा केंद्रातर्फे करण्‍यात आले आहे.
@@AUTHORINFO_V1@@