पंकजा मुंडे पक्षशिस्त विसरल्या का ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Dec-2019
Total Views |


पंकजा _1  H x W



मुंबई : गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर झालेल्या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी केलेल्या भाषणाबद्दल भाजपतील सर्वच नेते मंडळींकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. भाजपचे सहयोगी व भाजपचे राज्यसभेतील खासदार संजय काकडे यांनी पंकजा मुंडेंच्या भाषणाचा तीव्र शब्दात निषेध केला. "गडावर जमलेली गर्दी ही गोपीनाथ मुंडेंच्या नावामुळे होती. पंकजा यांना ऐकण्यासाठी कोणीही त्याठिकाणी आले नव्हते. पंकजा मुंडे कुठेतरी कमी पडल्या म्हणून त्यांचा पराभव झाला आहे आता त्याचे खापर त्या इतरांच्या माथी मारत आहे. " असा शब्दांत त्यांनी पंकजा मुंडेंवर शाब्दिक हल्ला चढविला.



पक्षशिस्तीचा भंग करू नका : प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील



खडसे व पंकजा मुंडे यांच्या कालच्या भाषणामुळे पक्षाचे अंतर्गत वाद चव्हाट्यावर आणले गेले. यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही पंकजा मुंडे व खडसे यांच्या भाषणावर नाराजी व्यक्त करत आपल्या सोलापूर येथील भाषणातून खडे बोल सुनावले. ते म्हणाले
," अडचणी असल्यास त्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी बोलून सोडवाव्या. अडचणींवर बोलून मार्ग काढता येतो. मात्र, उठसूट भाषणांमधून पक्षावर टीका करायच्या हे योग्य नाही. रोज उठून जर पक्षावर टीका करायची असेल तर पक्षांतर्गत कारवाया करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. सध्याचे वातावरण खूप वेगळे आहे. आपल्याला बक्षिसे ही दिले जाते तशी कारवाईही केली जाईल." असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.



''जातीपातीच्या राजकारणाने नाही तर ,कर्तृत्वाने मोठे होता येते...' : चंद्रशेखर बावनकुळे



विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारले गेलेले माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही खडसे व मुंडे यांनी केलेले आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला.
'भाजपमधील सगळेच ओबीसी नेते नाराज आहेत, असे म्हणणे चुकीचे आहे. पक्ष सत्तेत नसल्यामुळे आता जातीय राजकारण सुरू झाले हे. पण जातीपातीने माणसे मोठी होत नाहीत. तर ती कर्तृत्वाने मोठी होतात." माजी मुख्यमंत्री फडणवीस यांचेही त्यांनी कौतुक केले.

@@AUTHORINFO_V1@@