अयोद्धा निकालाला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका फेटाळल्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Dec-2019
Total Views |
rAM _1  H x W:

नवी दिल्ली : अयोद्धा निकालाच्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आल्या आहेत. या प्रकरणी गुरुवारी सुनावणी पार पडली. मुख्य न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या खंडपीठासमोर या सर्व याचिकांवर सुनावणी पार पडली. दुपारी पावणे दोन वाजता या सर्व याचिकांवरील सुनावणीला सुरुवात झाली होती.

 
सर्वोच्च न्यायालयात ९ नोव्हेंबर रोजी रंजन गोगोई यांच्या खंडपीठाने या प्रकरणावर निर्णय दिला होता. यावेळी विवादीत ढाचा असलेली जागा मंदिर निर्माण करण्यासाठी द्यावी, असे आदेश न्यायालयाने दिले होते. याबदल्यात मुस्लीम पक्षकारांना पाच एकर जागेवर मशीद उभारण्यासाठी परवानगी देण्यात आली होती.
 

सर्वोच्च न्यायालयाच्या या खटल्याविरोधात १८ पूर्नविचार याचिका दाखल झाल्या आहेत. यातील नऊ याचिका पक्षकारांनी दाखल केल्या होत्या तर अन्य याचिका इतर व्यक्ती व संस्थांनी केल्या होत्या. मुस्लीम पर्सनल बोर्ड लॉ तर्फे चार याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. वरील सर्व याचिका गुरुवारी न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत.

@@AUTHORINFO_V1@@