'हाऊ डेअर यु' म्हणणारी 'ती' ठरली 'पर्सन ऑफ द इयर'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Dec-2019
Total Views |


saf_1  H x W: 0

 


नवी दिल्ली : 'हाऊ डेअर यु' म्हणत सर्व जगाचे लक्ष वेधून घेणारी स्वीडनची पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग. नुकतेच तिला ‘टाइम मॅगझीन’ने ‘पर्सन ऑफ द इयर’ पुरस्काराने गौरवले आहे. ग्रेटा ही अवघ्या १६ वर्षांची असून हा बहुमान मिळालेली ती आत्तापर्यंतची सर्वांत तरुण व्यक्ती ठरली आहे. १९२७ पासून जगप्रसिद्ध टाइम मासिकाद्वारे 'पर्सन ऑफ द इयर' हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो.

 

ग्रेट थनबर्गबद्दल अधिक माहितीसाठी, हे वाचा...

 
 
 

वर्ष २०१८मध्ये ऑगस्ट महिन्यातच ग्रेटाने स्वीडनच्या संसदेसमोर आंदोलन केले होते. ग्रेटाने मागील वर्षी हवामान बदलांबद्दलच्या जागृती मोहिमेला सुरुवात केली होती. स्वीडनच्या संसदेसमोर दर शुक्रवारी ती निदर्शने करत होती. ग्रेटाच्या या कृत्याची जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली. त्यानंतर ग्रेटाच्या मोहिमेला आंतरराष्ट्रीय स्वरूप आले.

@@AUTHORINFO_V1@@