महाविकास आघाडीने अजित पवारांना डावलले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Dec-2019
Total Views |


ajit_1  H x W:


मुंबई : विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी महाविकासआघाडीचे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये गृहखाते शिवसेनेकडे गृह आणि नगरविकास खाते देण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. परंतु आज झालेल्या महाविकास आघाडीच्या तात्पुरत्या खातेवाटपातही अजित पवारांच्या वाटेल एकही खाते देण्यात आलेले नाही. मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी दरम्यान शपथ घेतलेल्या मंत्र्यांमध्येच हे खातेवाटप करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त कोणत्याही नवीन मंत्र्यांचा यात समावेश करून घेतला गेला नाही.



काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये खातेवाटपासाठी रस्सीखेच सुरु असल्यानेही खातेवाटपास विलंब होत असल्याच्या चर्चा आहे. अशातच कार्यकर्त्यांमधून अजित पवारांना महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद मिळावे या मागणीने जोर धरला आहे.अजित पवारांची नाराजी दूर करण्यासाठी पुढील मंत्रिमंडळ विस्तारात तरी त्यांना संधी मिळते का ते पाहणे महत्वाचे ठरेल. नुकतीच बहुचर्चित सिंचन घोटाळ्यातून अजित पवारांना क्लीन चिट देण्यात आली आहे.



आजच्या खातेवाटपात कोणाला कोणते खाते


आजच्या खातेवाटपात सुभाष देसाई यांच्याकडे उद्योग
, उच्च तंत्र शिक्षण या खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. छगन भुजबळ यांना ग्रामविकास, जलसंपदा, सामाजिक न्याय या खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर जयंत पाटील यांच्याकडे अर्थ नियोजन, गृहनिर्माण आणि सार्वजनिक आरोग्य या खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. नितीन राऊत यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम तर बाळासाहेब थोरात महसूल, उर्जा खाते सोपवण्यात आले आहे. उर्वरित खाते ही विस्तार होईपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहणार आहेत. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबर सुरु होणार आहे. हिवाळी अधिवेशन संपताच या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्यातरी मंत्रिमंडळ विस्तार होईपर्यंत अजित पवारांबाबतचे चित्र स्पष्ट होणार नाही.



 

@@AUTHORINFO_V1@@