उद्धव ठाकरे बनले पहिले 'बिनखात्याचे मुख्यमंत्री'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Dec-2019
Total Views |
UT _1  H x W: 0


मुंबई : महाराष्ट्रात हिवाळी अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारचे खातेवाटप जाहीर झाले आहे. मात्र, या मंत्रीमंडळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे कुठलेही महत्वाचे खाते नाही. त्यामुळे येत्या अधिवेशात विरोधकांच्या तोफांसमोर उद्धव ठाकरे थेट जाणार नसून त्यांनी नेमून दिलेल्या खात्यांचे मंत्री राज्यातील प्रश्नांना उत्तरे देतील, असे सध्याचे चित्र आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे नेमून दिलेल्या खात्यांव्यतिरिक्त सर्व अन्य खाती राहणार असल्याचे महाविकास आघाडीच्या परिपत्रकात म्हटले आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांच्याकडील खाती नेमकी कोणती याबद्दल अधिकृत माहिती अद्याप दिलेली नाहीत.

महाविकास आघाडीचे खातेवाटप जाहीर झाले. हिवाळी अधिवेशनापूर्वी हे खातेवाटप करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे कुठलेही खाते नसल्याने महाराष्ट्रातही दिल्ली पॅटर्न पाहायला मिळणार आहे. ज्या प्रमाणे दिल्लीत अरविंद केजरीवाल यांनी स्वतःकडे कुठलेही खाते न ठेवता केवळ मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली आहे, त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनीही स्वतःकडे कुठलेही खाते घेतलेले नाही. दरम्यान, मंत्रीमंडळात पूर्वीपासून प्रशासकीय कामांचा अनुभव असणारे मंत्री आता विरोधकांच्या तोफांना तोंड देणार आहेत.


1) एकनाथ शिंदे : गृह, नगर विकास, वने व पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, मृद व जलसंधारण, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम (सार्व. उपक्रम), संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण

2) सुभाष देसाई : उद्योग व खनिकर्म, कृषी, उच्च व तंत्र शिक्षण, क्रिडा व युवक कल्याण, रोहयो, फलोत्पादन, परिवहन, मराठी भाषा.

3) छगन भुजबळ : ग्रामविकास, जलसंपदा, लाभक्षेत्र विकास, सामाजिक न्याय, विशेष सहाय्य, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, अन्न व औषध प्रशासन

4) जयंत पाटील : वित्त व नियोजन, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, सहकार व पणन, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक कल्याण, कामगार, अल्पसंख्य कल्याण

5) बाळासाहेब थोरात : महसूल, ऊर्जा, अपरांपरागत ऊर्जा, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, पशू संवर्धन दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय .

6) नितीन राऊत : सार्वजनिक बांधकाम (सार्व. उपक्रम सोडून) आदिवासी विकास, महिला व बाल विकास, वस्त्रोद्योग, मदत व पुनर्वसन, इतर मागासवर्ग कल्याण, विमुक्त जाती भटक्या जमाती कल्याण, विशेष मागास प्रवर्ग कल्याण.


@@AUTHORINFO_V1@@