आयपीएल २०२०मध्ये ३३२ खेळाडूंवर बोली !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Dec-2019
Total Views |


asf_1  H x W: 0


नवी दिल्ली : इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल)चे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. महिन्याभरापूर्वीच आयपीएल २०२०मध्ये सहभाग घेतलेल्या संघांनी काही खेळाडू स्वतःकडे ठेऊन इतर खेळाडूंना रिलीज केले. त्यानंतर आता १९ डिसेंबरला कोलकत्तामध्ये नवीन खेळाडूंसाठी लिलाव प्रक्रिया सुरु होणार आहे. यामध्ये जगभरातून ९७१ खेळाडूंनी नाव रजिस्टर केले होते. यामधून आता ३३२ नावांचाच लिलाव प्रक्रियेसाठी विचार केला जणार आहे.

 

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आयपीएल २०२०च्या लिलावासाठी ९७१ खेळाडूंनी अर्ज दिले होते. त्यामध्ये ३३२ खेळाडूंचे अर्ज स्वीकारले गेले आहेत. या खेळाडूंचे विभाजन करताना २ कोटींच्या बेस प्राईजच्या लिस्टमध्ये एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही. यामध्ये ऑस्ट्रेलियायाचे ४, श्रीलंकेचा एक आणि दक्षिण आफ्रिकेच्या २ खेळाडूंचा समावेश आहे. या लिस्टमध्ये आणखी २४ नवीन तरुण खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

 

भारताचा माजी यष्टीरक्षक आणि धडाकेबाज फलंदाज रॉबिन उथप्पाचा १.५ कोटीच्या बेस प्राईजमध्ये समावेश करण्यात आला आहे. तसेच, जयदेव उनाडकतचा समावेश १ कोटींच्या लिस्ट मध्ये करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त आणखी कुठल्याही खेळाडूविषयी माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. त्यामुळे, यावर्षी लिलावामध्ये कोणाला अधिक बोली लागते याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@