अनेक विरोधकांच्या तोंडी पाकिस्तानी भाषा ; पंतप्रधान मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Dec-2019
Total Views |


saf_1  H x W: 0


नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती विधेयकासंदर्भात बुधवारी भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक झाली. "हे विधेयक ऐतिहासिक असून ते देशाच्या हिताचे आहे. या विधेयकासंदर्भात खासदारांनी आपापल्या मतदारसंघांमध्ये जनजागृती करावी." असे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत दिले. तसेच, 'या विधेयकावरून काही विरोधी पक्ष पाकिस्तानची भाषा बोलत आहेत.' अशी टीकादेखील पंतप्रधानांनी विरोधी पक्षांवर केली.

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे बुधवारी दुपारी १२ वाजता नागरिकत्व दुरुस्ती विधेयक, २०१९ राज्यसभेत सादर करणार आहेत. हे विधेयक याआधी सोमवारी लोकसभेत पारित झाले आहे. विरोधी पक्ष आणि पुर्वेकडील राज्य या विधेयकाच्या विरोधात आहेत. मंगळवारी आसाम आणि त्रिपुरामध्ये अनेक ठिकाणी विधेयकाविरोधात प्रदर्शन करण्यात आले. काँग्रेस या विधेयकाविरोधात देशव्यापी आंदोलन करणार आहे. पक्षाने राज्यातील काँग्रेसला पक्ष कार्यालयाबाहेर प्रदर्शन करण्याचे आदेश दिले आहेत.

@@AUTHORINFO_V1@@