नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर बोलण्यास संयुक्त राष्ट्राचा नकार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Dec-2019
Total Views |


UNO_1  H x W: 0



नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर हे विधेयक आज(बुधवारी) राज्यसभेत सादर करण्यात आले. या विधेयकाबाबत जगभरातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेने मात्र या विधेयकावर भाष्य करण्यास नकार दिला आहे.


नकार देताना संघटनेने म्हटले आहे की
, “आमचे केवळ एकच म्हणणे आहे की, सर्व देशांनी भेदभाव नसलेले कायदे पाळावेत.संयुक्त राष्ट्रांचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांचे उपप्रवक्ते फरहान हक यांना भारताच्या लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांच्या प्रतिक्रियेबाबत विचारण्यात आले. यावर त्यांनी म्हटले की, “माझ्या माहितीप्रमाणे, हा कायदा संविधानिक प्रक्रियेद्वारे मांडण्यात आला आहे. त्यामुळे आम्ही यावर तोपर्यंत कोणतीही टिपण्णी करणार नाही जोपर्यंत हे विधेयक भारतातील स्थानिक कायदेशीर प्रक्रियेतून जात आहे.

@@AUTHORINFO_V1@@