तुम्ही पाहिलात का रिंकूचा हा नवीन सोज्वळ ‘मेकअप’

    11-Dec-2019
Total Views |

rinku_1  H x W:


सैराट’ नंतर चर्चेत आलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू ‘कागर’ या चित्रपटातून एका वेगळ्या भूमिकेत दिसली होती. लवकरच रिंकू तिच्या ‘मेकअप’ या नवीन चित्रपटातून एका नवीन भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

वेगवगेळे विषय हाताळत, नेहमी काहीतरी नाविन्यपूर्ण कथा लिहिण्यात लेखक गणेश पंडित यांचा हातखंडा आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ते दिग्दर्शकाच्या रुपात आपल्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाचा टीझर मंगळवारी प्रदर्शित करण्यात आला.



रिंकू राजगुरूची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या टिझरमध्ये अभिनेता चिन्मय उदगीरकरही प्रेक्षकांना पाहायला मिळाला. याचाच अर्थ या चित्रपटात रिंकू-चिन्मय ही नवीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘हर देवदास की गर्लफ्रेंड कभी पारू नही होती, और ६%वाली बिअर कभी दारू नही होती,’ असं म्हणणाऱ्या रिंकूची यात दोन भिन्न रूपे पाहायला मिळत आहेत. रिंकूचा हा बिनधास्त आणि तिचा हा 'मेकअप' कशासाठी आहे, यासाठी मात्र थोडी वाट पाहावी लागणार आहे. ‘मेकअप’ हा चित्रपट येत्या ७ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.