नागरिकत्व सुधारणा विधेयकाला राज्यसभेकडून संमती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Dec-2019
Total Views |



rs_1  H x W: 0



'अमित शाह कि जय', अशा घोषणा दिल्या जात आहेत


नवी दिल्ली : राज्यसभेत १२५ मतांनी बहुचर्चित नागरिकत्व सुधारणा विधेयक संमत झाले. शिवसेनेने वॉक-आउट करण्याचा निर्णय घेतला होता. विधेयकावर अनेक बदल सुचविण्यात आले होते. मात्र त्या बदलांना राज्यसभेत अल्पमतात राहावे लागत होते. अखेर १२५ विरुध्द १०५ मतांनी नागरिक्त्व सुधारणा विधेयक संमत झाले आही. तटस्थ मते शून्य होती. आधी ११७ आकडा पटलावर दिसला मात्र नंतर हा आकडा वाढत जाऊन १२५ पर्यंत पोहोचला. मोदी सरकारचा हा ऐतिहासिक विजय समजला जातो आहे.


नव्या विधेयकाने आता भारतात आलेल्या धार्मिक अल्पसंख्याक शरणार्थीना नागरिकत्व मिळू शकेल. समाजमाध्यमात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अमित शाह कि जय, अशा घोषणा दिल्या जात आहेत. सोनिया गांधी म्हणाल्या आहेत , की हा काळा दिवस आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील निर्वासित हिंदूंनी जल्लोष व्यक्त केला आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@