प्रदर्शनानंतर पुन्हा एकदा चालणार कात्री?

11 Dec 2019 20:22:26

panipat_1  H x



प्रदर्शनापूर्वी सततच्या वादामुळे चर्चेत असलेला ‘पानिपत’ हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित करण्यात आला. प्रदर्शनानंतरही या चित्रपटाला जाट समुदायाकडून सतत विरोध दर्शवला जात आहे. वादअखेर चित्रपटाच्या निर्मात्यांनी काही दृश्यांवर कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे. आक्षेपार्ह दृश्य वगळल्यानंतर चित्रपट पुन्हा एकदा सेन्सॉर बोर्डाला दाखवण्यात येणार आहे.

भरतपुरचे तत्कालीन महाराज सूरजमल यांची व्यक्तिरेखा चुकीच्या पद्धतीने दाखवली म्हणून जाट समूदायाने चित्रपटाला कडाडून विरोध दर्शवला आहे. जाट समुदायाच्या नेत्यांनी सोमवारी सरकारला निवेदन पाठवलं होतं. दरम्यान, राजस्थानमधील अनेक चित्रपटगृहांमध्ये तोडफोडही करण्यात आली शिवाय चित्रपटाचे पोस्टरदेखील फाडण्यात आले. त्यामुळे राजस्थानमधील परिस्थिती अधिक चिघळण्याच्या आत या प्रकरणात सेन्सॉर बोर्डानं हस्तक्षेप करत योग्य ती पाऊलं उचलावीत अशी मागणी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली होती. चित्रपटाला विरोध म्हणून राज्याच्या अनेक भागांतून हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच हटवण्यात आला होता.

Powered By Sangraha 9.0