संपूर्ण गीता कंठस्थ असणाऱ्या आभा घाटगे हिचा 'गीताव्रती' पदवीने सन्मान

    दिनांक  11-Dec-2019 16:42:43
|
gita _1  H x W:
 

संगमनेर : गीता जयंतीनिमित्त संगमनेर येथे आयोजित करण्यात आलेल्या गीतापठण स्पर्धेत आभा सुहास घाटगे हीने प्रथम क्रमांक पटकवत 'गीताव्रती' ही पदवी मिळवली. शनिवार, दि. ७ डिसेंबर रोजी गीता जयंती तसेच प.पू. गोविंददेव गिरी स्वामी अध्यक्ष गीता परिवार यांच्या ७१व्या जन्मदिनाचे औचित्य साधून गीता परिवार संगमनेर तर्फे संगमनेर येथे संपूर्ण गीता कंठस्थ असलेल्या मूला मुलींची स्पर्धा घेण्यात आली होती.

 

आभा घाटगे हिने मिळवलेल्या यशाबद्दल प.पू. गोविंददेव गिरी महाराज यांच्या हस्ते पगडी, शेला व पदक देऊन सत्कार करण्यात आला. तिला गीताव्रती ही पदवी प्रमाणपत्राद्वारे बहाल करण्यात आली. दि. ८ डिसेंबर रोजी समस्त गीताव्रती साधकांनी अन्य ३५ हजार विद्यार्थांसह सरसंघचालक मोहनजी भागवत, प. पू. गोविंददेव गिरी स्वामी तसेच योगगुरू रामदेव बाबांच्या यांच्या उपस्थितीत बाराव्या व पंधराव्या अध्यायाचे पठण केले.