म.रे.ची पहिली एसी लोकल लवकरच मुंबईकरांच्या भेटीला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Dec-2019
Total Views |


saf_1  H x W: 0


मुंबई : मध्य रेल्वेची पहिली वातानुकूलित (एसी) लोकल येत्या महिन्याभरात प्रत्यक्षात रुळावर धावणार आहे. या लोकलची पहिली फेरी चालवण्याचा मान महिला मोटरमनला देण्यात येणार आहे. या एसी लोकलच्या दिवसभरात १० ते १२ फेऱ्या होतील. लोकल नेमकी कोणत्या मार्गावर धावणार याबाबतचा निर्णय प्रवासी संघटनांशी चर्चा करून घेण्यात येईल, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.

 

एसी लोकल चालवण्यापूर्वी प्रवाशांचे मत देखील विचारात घेतले जाणार आहे. मध्य रेल्वेची पहिली एसी लोकल सोमवारी कुर्ला कारशेडमध्ये दाखल झाली असून येत्या महिन्याभरात ही लोकल धावणार आहे. मध्य रेल्वे मार्गावरील पुलांच्या उंचीमुळे पहिली एसी लोकल २०१७ मध्ये पश्चिम रेल्वेला देण्यात आली. अखेर मंगळवारी कुर्ला कारशेडमध्ये पहिली एसी लोकल उभी करण्यात आली आहे. या लोकलमध्ये काही तांत्रिक बदल करून त्याच्या चाचण्या घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर ही लोकल मध्य रेल्वेच्या नेमक्या कोणत्या मार्गावर धावेल, याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुंबई विभागाचे अधिकारी शलभ गोयल यांनी दिली.

@@AUTHORINFO_V1@@