ठाणे-मुलुंड कारणांसाठी खुशखबर ! 'या' स्टेशनला दिली मंजूरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Dec-2019
Total Views |


asf_1  H x W: 0

 


ठाणे : ठाणे स्टेशनवरून प्रवास करणाऱ्यांसाठी एक खुशखबर. ठाणे स्टेशनवरील भर कमी करण्यासाठी आता रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकारने मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे आणि मुलुंड स्टेशनदरम्यान आणखी एक स्टेशन उभारण्यात येणार आहे. यासाठी ११९.३१ कोटींचा खर्च येणार असून यासाठी आता राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनाकडून परवानगी मिळालाय आहे.

 

गेली अनेक वर्षे ठाणे आणि मुलुंड स्टेशन दरम्यान आणखी एक स्टेशन उभारण्याची मागणी ही ठाणेकरांकडून होत होती. यामुळे ठाणे ते मुलुंड स्टेशनदरम्यान होणाऱ्या अपघातांना आळा बसेल अशी अशा ठाणेकरांनी व्यक्त केली होती. अखेर या प्रकल्पाला संमती मिळाली आहे. ठाणे महानगरपालिकेने १२.३५ एकराचा भूखंड आणि २९.८३ कोटी रेल्वे प्रशासनाला सोपवल्यानंतर या स्थानकाचे काम सुरु करण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

@@AUTHORINFO_V1@@