बायको कपडे धुवायला लावते म्हणून नवऱ्याने घेतला गळफास

    दिनांक  10-Dec-2019 15:09:22
|


saf_1  H x W: 0

 


पुणे : नुकतेच विद्यानगरी पुण्यातील एक धक्कादायक बातमी समोर आली. चार वर्षापूर्वी प्रेमविवाह झालेल्या एका व्यक्तीने बायको कपडे धुवायला सांगते, घरकाम करून घेते. या त्रासाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली. पुण्याच्या मगरपट्टा सिटीतील जिनिया सोसायटीत ही घटना घडली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

प्रणय मिलिंद खुटाळ असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पत्नी कनिका खुटाळ हिच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रणयची आई संगिता खुटाळ यांनी याबाबत तक्रार दिली आहे. प्रणय आणि कनिकाचा चार वर्षांपूर्वी प्रेम विवाह झाला होता. प्रणय हा मूळचा इंदोर येथील असून कनिका ही भोपाळची आहे. कनिका सध्या गृहिणी असून प्रणय एका खासगी कंपनीत कामाला होता.