भाजपसोबत जाणेच शिवसेनेच्या हिताचे : मनोहर जोशी

10 Dec 2019 19:20:49


manohar _1  H x


मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी भाजप आणि शिवसेनेला एकत्र येण्याची सूचना केली आहे. एका माध्यमाशी बोलताना जोशी म्हणाले, "भाजप आणि शिवसेना एकत्र राहिले तर बरे होईल असे मला वाटते. परंतु या क्षणी दोन्ही पक्षांना हे नको आहे."


महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर भाजप शिवसेनेचा मार्ग वेगळे झाले. महाराष्ट्रात भाजप शिवसेनेने एकत्र निवडणुका लढवल्या आणि स्पष्ट बहुमत मिळवले. पण मुख्यमंत्रिपदासाठी ५०-५० फॉर्म्युला ठेवून शिवसेनेने नवा वाद उभा केला. उद्धव ठाकरे अडीच वर्षे मुख्यमंत्री पदावर ठाम होते. परिणामी
, भाजपला शिवसेनेपासून वेगळे व्हावे लागले. शिवसेनेने कॉंग्रेस व राष्ट्रवादी यांच्यासह सरकार बनवले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली. मुख्यमंत्री पदाची सूत्रे स्वीकारून इतका काळ उलटूनही महाराष्ट्रात अजूनही खातेवाटप झालेले नाही. तशातच शिवसेनेच्या केंद्रात आणि राज्यात वेगवेगळ्या भूमिकेवरून काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात वारंवार द्वंद्व होत असल्याचेही दिसून येते.

Powered By Sangraha 9.0