सह्याद्रीच्या सिंहाची शौर्यगाथा आता मराठीत !

10 Dec 2019 17:38:58
aj_1  H x W: 0


अजय देवगण आगामी बहुचर्चित चित्रपट ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिर’ या हिंदी चित्रपटाचा मराठी अनुवाद होणार असल्याच्या चर्चा बऱ्याच रंगल्या होत्या. मंगळवारी या चित्रपटाचा मराठी ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आणि या चर्चांना पूर्णविराम मिळाला.



 

या चित्रपटात अभिनेता शरद केळकर छत्रपती शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा साकार आहे. अजय देवगण तानाजींची भूमिका साकार असून आणि अभिनेत्री काजोल तानाजींची पत्नी सावित्रीबाई मालुसरेंची भूमिका साकारत आहे. या चित्रपटातून काजल प्रथमच मराठमोळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सैफ अली खान खलनायक उदयभान राठोडच्या भूमिकेत दिसणार आहे. यांच्यासह देवदत्त नागे, अजिंक्य देव हे मराठमोळे कलाकार देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ओम राऊत दिग्दर्शित 'तानाजी: द अनसंग वॉरियर' हा सिनेमा १० जानेवारी २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Powered By Sangraha 9.0