निर्भया हत्याकांडातील चारही दोषींना होणार फाशी ?

10 Dec 2019 12:35:27


asf_1  H x W: 0

 

१६ डिसेंबरला 'त्या' प्रकरणाला पूर्ण होणार ७ वर्ष

 


नवी दिल्ली : हैदराबादमध्ये पशुवैद्यकीय डॉक्टरवर बलात्कार प्रकरणी पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरची घटना ताजी असताना गेली ७ वर्षे प्रतीक्षेत असलेल्या दिल्लीतील निर्भया प्रकरणातील आरोपींना कधी शिक्षा होणार ? असा प्रश्न विचारला जात होता. मात्र, निर्भया हत्याप्रकरणातील आरोपींना फाशी देण्याच्या तयारीला सुरुवात झाली असल्याची माहिती सुत्रांनी  दिली आहे. 

 
निर्भया हत्या प्रकरणातील चौथा आरोपी पवनला मंडोली तुरुंगातून आता तिहारमध्ये हलवले आहे. या प्रकरणामधील इतर ३ आरोपी हे पूर्वीपासून तिहार तुरुंगात आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या १६ डिसेंबरला या आरोपींना फाशी देण्यात येणार आहे. मुकेश, विनय आणि अक्षय हे तीनही आरोपी तिहार तुरुंगामध्येच होते. आता पवनला तिहार तुरुंगामध्ये हलवून त्यांना लवकरच फाशी देण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत. 
Powered By Sangraha 9.0